संजय राऊतांच्या कन्येच्या साखरपुड्यात राज ठाकरेंच्या अनुपस्थितीची चर्चा

संजय राऊतांच्या कन्येच्या साखरपुड्यात राज ठाकरेंच्या अनुपस्थितीची चर्चा

मुंबई :- शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांचे चिरंजीव मल्हार (Malhar Narvekar) यांचा साखरपुडा काल झाला. या कार्यक्रमात मनसेचे (MNS) नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशिवाय राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते आले होते, त्यामुळे राज ठाकरे यांच्या न येण्याची चर्चा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar), साताराचे खासदार श्रीनिवास पाटील (Srinivas Patil), डॉक्टर तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahanae), खासदार संजय राऊत, त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत (Sunil Raut) गप्पा मारत असताना राज ठाकरे यांचा विषय निघाला त्यावेळी संजय राऊत यांनी सांगितले की, राज ठाकरे यांचा हात दुखतो आहे म्हणून ते आले नाहीत.

राऊत-फडणवीस गळाभेट
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे सोबतच आले होते. मल्हार आणि पूर्वशी यांच्यासोबत नार्वेकर कुटुंबीय आणि संजय राऊत यांच्या पत्नी उपस्थित होत्या. फडणवीस आणि दरेकर यांना राजेश नार्वेकर यांनी नमस्कार केला. फडणवीसांनी मल्हार आणि पूर्वशी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे असलेले संजय राऊत यांनी फडणवीसांना पाहिले आणि ते फडणवीसांकडे आले. राऊत यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली. दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळाले.

ही बातमी पण वाचा : संजय राऊतांच्या कन्येच्या साखरपुड्याचे खास फोटो व्हायरल !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER