सांगलीत “आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच” या पोस्टर्सची चर्चा

जयंत पाटील

सांगली : ‘करेक्ट कार्यक्रम’ म्हटलं की, प्रत्येका समोर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचचं नाव समोर येत. आताही सांगली शहरात या ‘करेक्ट कार्यक्रम’ शब्द प्रयोगाची जास्त चर्चा आहे. कारणही तसचं आहे. सांगली शहरात “आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच” या आशयाचे पोस्टर्स झळकत आहेत. त्यामुळे आता सांगलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

राज्यातील पदवीधर निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर “आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच” या आशयाचे पोस्टर्स शहरात झळकत आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) त्यांच्या राजकारणातील डावपेचामुळे नेहमीच चर्चेत असतात. जयंत पाटील नेहमी करेक्ट कार्यक्रम या वाक्याचा वापर करतात. त्यामुळे हे वाक्य सद्या राज्यभर प्रसिध्द आहे.

सांगली महापालिकेमध्ये (Sangli Municipal Corporation) भाजपची (BJP) सत्ता आहे. हीच सत्ता जयंत पाटील आता महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) घेणार का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महापालिकेत भाजपला बहुमत काठावर आहे. येणाऱ्या दोन महिन्यात सांगलीत महापौरपदाची निवड होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सद्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER