पूनावालांनी देश सोडल्याची चर्चा : सायरस म्हणालेत …

Maharashtra Today

लंडन : जागतिक लस उत्पादक कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला हे गेल्या महिन्यात लंडनला गेले. आता त्यांचे वडील व सीरम इंस्टीट्यूट समुहाचे अध्यक्ष सायरस पूनावालाही(Cyrus Poonawala) लंडनला रवाना झाले आहेत. यानंतर पूनावाला परिवारानं देश सोडला का, असे तर्क – वितर्क सुरू झाले आहेत. यावर अशा अफवा पसरवणाऱ्यांना सायरस यांनी उत्तर दिले – अफवा पसरवणारे मूर्ख आहात.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सायरस पूनावाला म्हणाले की, दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी लंडनला येतो. त्यामुळे, आता जी लोकं असे म्हणत आहेत की, मी आणि माझ्या मुलाने देश सोडला; ते खोटे आणि मूर्खपणाचे आहे. मी दरवर्षी मे महिन्यात लंडनला येत असतो. अदरही लहानपणापासून इथे येत असतो. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी येथे येणे यात नवीन काहीही नाही.

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) ही कंपनी सध्या कोरोना विषाणूवरील कोविशिल्ड या लसीचे उत्पादन करते आहे. देशातील लसीच्या ९० टक्के लसीचे उत्पादन ही कंपनी करते. माझ्यावर राजकीय दबाब वाढतो आहे, असे पूनावाला यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. त्यानंतर पूनावाला यांना फोन करून दबाब टाकणारे लोक नेमके कोण? हा प्रश्नही राजकीय वर्तुळात गुढ बनून राहिला आहे.

अदर पूनावाला गेल्या एक महिन्यापासून लंडनमध्ये असून ते युरोपमध्ये लस निर्मितीचे नवीन युनिट सुरू करण्याचा विचार करत असल्याचे संकेत यापूर्वीच मिळाले आहेत. याची पुष्टी पुन्हा एकदा सायरस पूनावाला यांनी केली. सायरस म्हणाले की, ‘सध्या पुण्यात लस तयार केली जाते आहे. आम्ही युरोपमध्ये एक नवीन युनिट स्थापित करण्याच्या विचार करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button