रत्नागिरीत ऑनलाईन दारू विक्री सुरू असल्याची चर्चा; दारू विक्रेत्यांची पोलिसात तक्रार

Ratnagiri - Alcohol - FIR

रत्नागिरी/प्रतिनिधी : लॉकडाऊन कालावधीत संपूर्ण देश बंद असताना रत्नागिरी शहरात राजरोसपणे ऑनलाईन पद्धतीने दारू विक्री केली जात असल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली असून रत्नागिरी शहरातील मद्यविक्री करणाऱ्या दोन दुकानांच्या नावाने चक्क फेसबुक पेज सुरु करून त्यावर दारूची ऑर्डर घेऊन घरपोच डिलिव्हरी केले जात असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या पुलांचे काम नव्या ठेकेदारांच्या नियुक्तीने सुरु करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना

ही फेसबुकपेज ज्या दुकानांच्या नावाने सुरु करण्यात आली आहेत त्यांच्या मालकांनी मात्र या गोष्टीचा इन्कार केला आहे. याबाबत एका दुकानदाराने पोलिसांकडे तक्रार दिली असून दुसरा दुकानदार देखील तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात पोहचला आहे. या फेसबुक पेजवर दारूची ऑर्डर देण्यासाठी मोबाईल नंबर देखील देण्यात आला आहे.