
सांगली : जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) नेहमी वेगवेगळ्या कारणांनी नेहमी चर्चेत असतात. त्यांच लहान मुलांवर विशेष प्रेम असत. ते राज्यात कोठेही दौऱ्यावर असतात तेव्हा लहान मुलांनाही वेळ देतात त्यांच्यात मिक्स होऊन त्यांच्याशी चर्चा करतात. असाच एक किस्सा आज त्यांच्याच मतदार संघात घडला आहे. एका चिमुकल्याने त्यांना फोटो काढण्याची मागणी केली तेव्हा जयंत पाटलांही फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. हा फोटो आज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मंत्री जयंत पाटील आज इस्लामपूर मतदार संघात दौऱ्यावर आहेत. यावेळी नवेखेड या गावातील एका लहान मुलाने जयंत पाटील यांना तुमचा फोटो काढायचा आहे अशी विनंती केली. यावेळी जयंत पाटील यांनी होकार दिला. तो चिमुकला फोटो काढत असताना जयंत पाटील त्या चिमुकल्याला फोटो चांगला आला पाहीजे असंही म्हटल्याचं व्हिडिओत दिसत आहे. फोटो काढल्यानंतर त्या चिमुकल्याने पाटील यांना कवितेप्रमाणे तोंडपाठ असलेले मंगलाष्टक म्हणूक दाखवल्या. यावेळी जयंत पाटील यांनी त्या चिमुकल्याला जवळ घेऊन शाबासकी दिली. पाटील यांचा हा साधेपणा सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला