फडणवीस यांच्या कोरे आणि आवाडे भेटीची कोल्हापुरात चर्चा

Devendra fadnavis

कोल्हापूर :- माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे भाजपाचे दोन दिग्गज नेते कोल्हापूर जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांच्या भेटीसाठी रविवारी संध्याकाळी कोल्हापुरात येत आहेत. या भेटी खाजगी स्वरूपाच्या असल्या तरी बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर त्याचे राजकीय संदर्भ काय असणार याची जिल्ह्यात चर्चा होत आहे.

केंद्र शासनाने कृषी कायदे केले असून, त्याविरोधात देशभर शेतकरी आंदोलन करीत आहेत. या कायद्याचे समर्थन करण्यासाठी भाजपा किसान सभा व रयत क्रांती संघटनेच्यावतीने आत्मनिर्भर यात्रा सुरू केली आहे. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे इस्लामपूर येथे रविवारी सायंकाळी येत आहेत. तेथील सभा संपल्यानंतर ते कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहेत.

सर्वप्रथम फडणवीस हे माजी मंत्री आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या भेटीसाठी वारणानगर येथे जाणार आहेत. आमदार कोरे यांच्या आई सावित्रीबाई कोरे यांचे अलीकडेच निधन झाले होते. फडणवीस सांत्वनपर भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यानंतर ते तेथून इचलकरंजी येथे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना भेटणार आहेत. त्यांच्या पत्नी इंदुमती आवाडे यांचे अलीकडे निधन झाले. त्यांचे सांत्वन करण्यासाठी फडणवीस भेटणार आहेत. तसेच यावेळी ते कल्लाप्पा आवाडे यांना व भाजपाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचीही भेट घेणार आहेत.

ही बातमी पण वाचा : राज्याचे हजारो कोटींचे नुकसान करणारा निर्णय तत्काळ स्थगित करा; फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER