
मुंबई :- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज दिल्लीत असून पक्ष प्रभारी आणि हायकमांडची भेट घेऊन प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र, बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा हायकमांडला मान्य नसल्याचे समजते. या वृत्ताबाबत हायकमांडने नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई काँग्रेस (Congress) अध्यक्षपदी नुकतीच हायकमांडने भाई जगताप यांची निवड केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) आज दिल्लीत असून पक्ष प्रभारी आणि हायकमांडची भेट घेऊन प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस वेणू गोपाळ यांची भेट घेऊन पक्षाच्या राज्य प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते.
ही बातमी पण वाचा : थोरातांनी बाबर खानदानावरची काँग्रेसची निष्ठा सिद्ध केली; भातखळकरांचा टोमणा
ही माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधींनी नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब थोरात यांना राजीनामा कुणी मागितला, ते का राजीनामा देत आहेत? असे प्रश्न सोनिया गांधींनी संबंधित नेत्यांना विचारले आहेत. पक्षाच्या संकटाच्या काळात सर्वाधिक साथ देणाऱ्या नेत्यांमध्ये बाळासाहेब थोरात आहेत.
मात्र, सध्या राज्यातील काँग्रेस पक्षात अंतर्गत मतभेद असल्यानेच बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ इच्छित असल्याचे समजते. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. विदर्भात काँग्रेसला मिळालेले यश पाहता विदर्भातून नाना पटोले, नितीन राऊत, यशोमती ठाकूर तर मराठवाड्यातून अमित देशमुख यांचेही नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत आहे.
ही बातमी पण वाचा : ‘नामांतरावरुन राजकारण खेळू नका’, बाळासाहेब थोरांतांनी CMO ला खडसावलं
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला