पवार आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा, धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत आज निर्णय घेण्याची शक्यता

Dhanajay Munde-Sharad Pawar-Uddhav Thackeray

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर ठाकरे सरकार चांगलंच कोंडीत सापडलं आहे. त्यातच विरोधी पक्ष भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेत थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. तसेच स्वतः धनंजय मुंडे किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजीनामा न घेतल्यास भाजप राज्यभर आंदोलन करत रस्त्यावर उतरेल, असाही इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा झाली आहे. यात महाविकास आघाडी सरकारची धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावर काय भूमिका का असावी याविषयी चर्चा झाली. याबाबत आज पवार आणि ठाकरे यांची भेटही होण्याची शक्यता आहे. या भेटीत धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यताही सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी एका गायक तरुणीने बलात्काराचे आरोप केल्यानंतर बुधवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार- धनंजय मुंडे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना भेटून त्यांची सविस्तर भूमिका पवारांसमोर मांडली. तसंच त्यांची भूमिका स्पष्ट केली.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांचे राजकारण नैतिकतेचे, ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा नक्की घेतील : चंद्रकांत पाटील 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER