नेताजींच्या मृत्यूचे गूढ शोधून काढा; मोदींना ममता बॅनर्जी यांचे पत्र

- जयंतीनिमित्त सुटी घोषित करण्याची केली मागणी

mamta Banerjeei & PM Modi

कोलकाता :- नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी सुटी घोषित करा आणि त्यांच्या मृत्यूचे गूढ शोधून काढा, अशी मागणी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र पाठवून केली आहे. ममता यांनी गेल्या आठवड्यात मोदींना याबाबत पत्र लिहिले होते.

आज पुन्हा एक पत्र मोदींना लिहिले आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांनी नेताजींच्या गूढ मृत्युप्रकरणाचा शोध घेणाऱ्या मुखर्जी आयोगाच्या अहवालाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या अहवालात कुठलेही कारण किंवा माहिती न देताच, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मृत घोषित केले, असे म्हटले आहे. नेताजी यांचे वंशज सूर्य बोस आणि माधुरी बोस यांनीही याबाबत एक खुले पत्र लिहिले आहे.

ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे की, ८ नोव्हेंबर २००५ च्या न्यायमूर्ती मनोजकुमार मुखर्जी यांच्या अहवलात असे नमूद केले की, नेताजी यांचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला नाही. जपानमधील टोकियोतील रेंकोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थी नेताजी यांच्या नाहीत. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहून ममता बॅनर्जी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी तपास करावा, अशी मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER