कोरोनाकाळातील बांधकामांवरील प्रिमियममध्ये सूट, निर्णय कुठे अडला? – आशिष शेलार

Ashish Shelar

मुंबई : कोरोनाच्या (Corona) साथीच्या काळात बांधकामांवरील प्रिमियममध्ये सूट देण्याबाबतचा निर्णय अजून झाला नाही. यावर टीका करताना भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टोमणा मारला, ची फाईल कॅबिनेटच्या दारापर्यंत येऊन का अडकली ? निर्णयाला नेमका उशीर का होतोय? ही सूट देऊन घरांच्या किंमती कमी होतील का? ग्राहकांना फायदा होईल का? बिल्डरांच्या फायद्यासाठी तर हा निर्णय घेतला जात नाही ना?

या व्यवहारात ‘घेण्या-देण्याचा’ व्यवहार होतो, असे सुचवताना शेलार यांनी दुसरे ट्विट केले –

रेडिरेकनर आणि युडिसीआर प्रमाणे ही प्रिमियमची फाईल सुध्दा “प्रिमियम लक्ष्मी दर्शन” करतेय की काय? काँग्रेसच्या “हातावर” यातील अद्याप काहीच ठेवले नाही की काय? पालिकेतील स्टँडिंग प्रमाणे मंत्रालयात सहव्या मजल्यावर काही अंडरस्टँडिंग सुरु आहे की काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER