राजीव सातव यांच्या जागेवर कोण? काँग्रेसमध्ये नावावरून मतभेद

नवी दिल्ली :- महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. ते गुजरातचे काँग्रेस प्रभारी होते. आता गुजरात काँग्रेस प्रभारी म्हणून कोणाची नेमणूक होणार, याकडे सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या जाण्यामुळे दोन पदे रिकामी झाली आहेत. या जागेवर काँग्रेसमधील नेत्यांचे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे सातव यांच्या जागी महाराष्ट्र काँग्रेसमधील दोन नावांची विशेष चर्चा आहे.

गुजरातमध्ये नवीन काँग्रेस प्रभारी कोण असेल याविषयी काँग्रेस पक्षात उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत. आता राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी आणि अशोक गेहलोत यांनी काही नावे काढली असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक आणि माजी महासचिव अविनाश पांडे (Avinash Pande) या दोघांची नावे चर्चेत आहेत. सूत्रानुसार, प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) या मुकुल वासनिक यांच्या बाजूने आहेत. तर राहुल गांधी अविनाश पांडे यांना पसंती देत आहेत.

पांडे हे सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) विश्वासातले आहेत असे बोलले जात आहे. अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचादेखील अविनाश पांडेंना पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी अविनाश पांडे यांना सोनिया गांधी यांनी वॉररूमचे प्रभारी केले होते. पांडेंच्या देखरेखीखालीच महिनाभर काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये सुरक्षित होते. त्यांची सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे पांडे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मुकुल वासनिक यांचे पक्षातील संघटनात्मक काम महत्त्वाचे आहे. सुरुवातीपासूनच ते काँग्रेसचे महत्त्वाचे नेते राहिले आहेत. त्यांना गुजरात आणि तेथील राजकीय स्थिती समजून घ्यायला बराच वेळ लागेल, मात्र, आता यासाठी वेळ नाही. कारण पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील.

या दोघांशिवाय नीरज डांगी, माजी मंत्री रघुवीरसिंग मीना आणि हर्षवर्धन सपकाळ यांचीही नावे चर्चेत आहेत. राजीव सातव यांच्या जागेवर विशेषतः मुकुल वासनिक यांची नजर आहे. पांडे राज्यसभा खासदार होते. पण सध्या काँग्रेसमध्ये एखादा ब्राह्मण चेहरा पाठवण्याचा विचार होत आहे. कारण आता आनंद शर्मा निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी मुकुल वासनिक यांचा चेहरा पुढे येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button