ठाकरे सरकारच्या बैठकीत मराठा विरुद्ध OBC वाद ; काही मंत्र्यांची आक्रमक भूमिका!

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे . यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजासाठी मंगळवारी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यासाठी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मुद्यांवर मंत्र्यांमध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती आहे .

या बैठकीत मराठा नेते विरुद्ध OBC नेते असे मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निर्णय घेतांना या मंत्र्यांची बाजू ऐकून घ्यावी लागेल . हा विषय संवेदनशील असल्याने आणि दोनही समाजाचठी असल्याने सरकारला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल असं मत राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केले आहे.

मराठा समाज, विद्यार्थी आणि तरुणांना आर्थिक मदत देताना ओबीसी (OBC) आणि धनगर समाजातील (Dhangar) लोकांचा त्यांचा विसर पडू देऊ नका अशी भूमिका काही कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली होती.

राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे विजय वड्डेटीवार या मंत्र्यांनी ओबीसी समाज महामंडळासाठी ‘सारथी’ (Sarathi)च्या धर्तीवर आर्थिक पॅकेजच्या मदतीची मागणी केली.

ओबीसी समाजाच्या आरक्षण कोट्यात हस्तक्षेप नको, अशीही मागणी  या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली असल्याची माहिती आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER