कोविन अ‍ॅपच्या तांत्रिक अडचणींमुळे लोकांची गैरसोय, संपूर्ण विकेंद्रीकरण करा; जयंत पाटलांची मागणी

CO-WIN App-Jayant Patil

मुंबई : “कोविन अ‍ॅपमधील (CO-WIN APP) तांत्रिक अडचणींमुळे लाखो लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे भारत सरकारने लसीकरण अ‍ॅपचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे.” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. सध्या देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. कोविन अ‍ॅपद्वारे नोंदणी करणाऱ्यांनाच लस देत आहे.

“कोविन-अ‍ॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी येत असल्यामुळे लॉगिन व ‘OTP’साठी विलंब आणि अनेक तक्रारी येत आहेत. एका अ‍ॅपवरून जवळपास १.३ अब्ज भारतीयांची वेळेवर नोंदणी होणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीत महत्त्वपूर्ण लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रणाली मर्यादित आहे आणि त्यातील त्रुटी अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत.” असेही जयंत पाटील यांनी नमूद केले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक राज्याला स्वतंत्र अ‍ॅप तयार करून द्यावे किंवा महाराष्ट्राला स्वतःची अ‍ॅप निर्माण करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. केंद्राने यावर त्वरित विचार करावा.” असेही पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button