दिव्यांग व्यक्तींना मिळणार हक्काचे घर; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

मुंबई :- मुंबईत घर घेण्याचे स्वप्न (Dream Home) पाहणाऱ्यांच्या यादीत दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. याबाबत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हाडाच्या लॉटरीमध्ये ५ टक्के घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव असणार आहे, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे.

मुंबईत प्रत्येकाचे हक्काचे घर असावे, यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. गृहनिर्माण मंत्रालयाच्या म्हाडा तर्फे उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातील ५ टक्के घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू असणार आहे, अशी माहिती आव्हाड यांनी ट्विट करून दिली.

४ हजार घरांची लॉटरी

दरम्यान, दिवाळीत मुंबईतल्या ४ हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहेत. यापैकी जवळपास ३ हजार ४०० घर ही एकट्या गोरेगावमध्ये असतील. हे घर म्हाडाच्या जमीनीवर बांधले असल्याने मागील वर्षांच्या तुलनेत ते अधिक स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, गोरेगाव आयटी पार्कपासून ही जागा जवळ असल्याने बर्‍यापैकी प्राईम लोकेशन आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button