दत्तक घेतलेला मुलगा परत करावा लागणार दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदला

Siddharth Anand

यशस्वी दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद सध्या शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण (Pathan) सिनेमाच्या निर्मितीत व्यस्त आहे. सिद्धार्थने (Siddharth Anand) गेल्या वर्षी ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ अभिनीत ‘वॉर’ सिनेमा प्रेक्षकांसमोर आणला होता. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. गेल्या वर्षीच सिद्धार्थ आनंदने एक मुलगाही दत्तक घेतला होता. पंरतु आता त्या मुलाची आई समोर आली असून तिने मुलगा परत मागण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सिद्धार्थला मुलगा परत द्यावा लागणार असे म्हटले जात आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बोरीवली रेल्वे स्टेशनवर एक महिला मुलाला दूध पाजत होती. पोलिसांनी चौकशी केली असता त्या महिलेची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे दिसून आले. तसेच मुलाच्या अंगावर खूप जखमाही आढळून आल्या होत्या. तेव्हा पोलिसांनी मुलाला बाल कल्याण समितीच्या हवाली केले आणि मानसिक रोगाने त्रस्त असलेल्या त्या महिलेला कर्जत येथील श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे त्या महिलेवर उपचार सुरु असतानाच मुलगा अनाथ असल्याचे समजून बाल कल्याण समितीने फॅमिली सर्व्हिस सेंटरच्या मदतीने त्याला एक अनाथ आश्रममात पाठवले.

प्रख्यात दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि त्याची पत्नी ममता भाटिया यांना रणबीर नावाचा एक मुलगा आहे. परंतु आणखी एक मुलगा हवा असल्याने त्यांनी अनाथ आश्रमात जाऊन जेव्हा मूल दत्तक घेण्याचा विचार केला. त्यांना बोरीवली स्टेशनवर सापडलेला मुलगाच आवडला आणि त्यांनी त्याला दत्तक घेतले. सिद्धार्थ आनंदला त्या मुलाबाबत काहीही माहिती नव्हते. घरी आणल्यानंतर त्या मुलासोबत सिद्धार्थचे चांगले सूर जुळले. परंतु एक दिवस त्या मुलाची आई बरी होऊऩ पत आली आणि बाल कल्याण समितीत जाऊन आपला मुलगा परत मागू लागली. डीएनए टेस्टमध्येही तो मुलगा त्या बाईचाच असल्याचेही सिद्ध झाले आहे. मुलगा आपल्याकडेच राहावा यासाठी सिद्धार्थने खूप प्रयत्न केले परंतु मुलगा त्या बाईचा असल्याचे सिद्ध झाल्याने त्याला आता तो मुलगा परत करावा लागणार आहे. सध्या मुलगा सिद्धार्थ आनंदसोबतच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER