दिग्दर्शक एस. एस. राजामौलीला धमकी

दिग्दर्शक एस. एस. राजामौलीला धमकी

बाहुबली (Baahubali) चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रिय झालेला दिग्दर्शक एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) ब्रिटिशांविरुद्ध लढा पुकारणाऱ्या दोन क्रांतीकारकांच्या जीवनावर एक ऐतिहासिक चित्रपट तयार करीत आहे. आरआरआर असे त्याचे नाव असून यात ज्यूनियर एनटीआर आणि रामचरण हे दोघे क्रांतीकारकांची भूमिका साकारत आहेत. त्याशिवाय अजय देवगन, आलिया भट्ट यांच्याही यात महत्वाच्या भूमिका आहेत. आमिर खानही या चित्रपटाशी जोडला गेला असून तो चित्रपटाला आवाज देणार आहे. चित्रपटाचा पहिला लुक रिलीज झाल्यानंतर एस. एस. राजामौलीला धमक्या देण्यात येऊ लागल्या आहेत.

आरआरआर चित्रपटात ज्यूनियर एनटीआर यात क्रांतीकारक कोमाराम भीम यांची भूमिका साकारीत आहे. मात्र टीझरमध्ये ज्यूनियर एनटीआरने आदिवासी असलेल्या कोमाराम भीमने मुस्लिम घालतात तशी टोपी घातल्याचे दाखवले आहे. यामुळे आदिवासी समाजाचा अपमान होत असून राजामौलीने हे दृश्य बदलावे अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकी तेलंगणातील आमदारांनी त्याला दिली आहे. यात आता राजकीय पक्ष उतरला असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनावर संकट घोंघावू शकते. खरे तर चित्रपटाचे अजून शूटिंगही पूर्ण झालेले नाही. मात्र टीझरने चित्रपटाबाबत वाद निर्माण करण्यास सुरुवात केलेली आहे.

राजामौली आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER