परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास पोलीस महासंचालकांचा नकार !

Maharashtra Today

मुंबई :- मुंबईचे (Mumbai) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parmbir S ingh) यांची चौकशी करण्यास नकार देणारे पत्र पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी गृहखात्याला लिहिले आहे. त्यांच्या या पत्रामुळे खळबळ उडाली आहे.

परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात संजय पांडे यांच्या विरोधात याचिका केली आहे. या याचिकेत अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील १०० कोटी वसुली प्रकरणी (100 crore Target case)आरोप मागे घेण्यासाठी संजय पांडे दबाव टाकत असल्याचे आरोप करण्यात आले आहे. त्यानंतर आता संजय पांडे यांनी राज्य सरकारला पत्र लिहून ही चौकशी करण्यास नकार दिला आहे. परमबीर सिंग यांच्या याचिकेवर ५ मे रोजी सुनावणी होणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनीच परमबीर सिंग यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी तक्रार केली होती. डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर अंडरवर्ल्डसोबत संबंध आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. २०१९ मध्ये डांगे यांनी एका पबवर धाड टाकली होती. तेव्हा तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावाने पब मालकाने डांगे याने धमकी दिली होती. नंतर डांगे यांना खातेनिहाय चौकशी करुन निलंबित करण्यात आले होते. पुर्ननियुक्ती करण्यासाठी डांगेंकडून परमबीर सिंह यांच्या खास माणसांनी २ कोटी रुपये मागणी केली होती. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button