थेट पाईपलाईन योजना मार्गी लावा : प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

Dr. kadambari Balkwade

कोल्हापूर :- थेट पाईपलाईन (Direct pipeline plan) योजनेतील प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावून योजनेच्या कामाला गती द्या, असे निर्देश महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधितअधिका-यांना दिले. बलकवडे यांनी आज काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरास थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या योजनेची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी काळम्मावाडी येथील जॅकवेल, राजापूर व नरतवडे येथील पाईपलाईन आणि पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रकल्प अधिकारी हर्षजित घाटगे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वन्यजीव व वन विभाग व महावितरण विभाग यांच्याशी योग्य समन्वय ठेवून प्रकल्पाची कामे प्राधान्याने व्हावीत, यासाठी समयबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याची सूचना प्रकल्प अधिकारी यांना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिली.

डॉ. बलकवडे यांनी सुरुवातीस राधानगरी तालुक्यातील राजापूर येथील जॅकवेलच्या कामाचा आणि १८०० मीमी व्यासाच्या गुरुत्ववाहिनी पाईपलाईनच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. धरण क्षेत्रातील इन्स्पेक्शन वेल , इंटेक वेल, कनेक्टिंग पाईप, जॅकवेल इत्यादी कामे पूर्ण करण्याच्या कालावधीबाबत नियोजित वेळेचा बार चार्ट तयार करण्याची सूचनाही प्रकल्प अधिकारी यांना केली. तसेच वन विभागाशी संबंधित गट नंबर ५१ व गट नंबर १७४ मधील प्रलंबित कामाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली.

ही बातमी पण वाचा : तिरुपती-कोल्हापूर रेल्वे बंद 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER