कोरोनाबाधिताचा ३० गावांतील २०० लोकांशी थेट संपर्क; प्रशासन हादरले

30 villages affected by Corona

कोल्हापूर :- शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील कोरोनाच्या संसर्गामुळे मयत झालेल्या वृद्धाच्या नांदणीतील एका मुलाचा व कोल्हापूर शहरातील जावयाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नांदणीतील त्या हॉस्पिटलमधील डॉक्‍टर तसेच त्या वृद्धाच्या घरातील अन्य कुटुंबीयांसह १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान २८ जून रोजी त्या वृद्धाच्या घरातील एका मुलाने सुमारे २०० जणांना कुत्रे, मांजर, उंदीर, चावल्यानंतर दिले जाणारे देशी औषध कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे ३० गावांत दिले आहे.

शिरोळ, मिरज, मालगाव, कोरोची, सांगली, इचलकरंजी, शिरढोण, जयसिंगपूर, रेंदाळ, गांधीनगर, कबनुर, टाकवडे, चिपरी, आष्टा, सावळी, हरीपूर, ताणंग, मजले, मंगसुळी, मणेराजुरी, अब्दुललाट, धरणगुत्ती, उदगाव, खटाव, घालवाड, कुटवाड, नृसिंहवाडी, कोथळी इत्यादी ही गावे आहेत. सुमारे २०० नागरिकांना कुत्रे, मांजर, उंदीर चावल्यानंतर दिले जाणारे औषध दिले आहे. यामुळे या नागरिकांचा शोधही प्रशासन घेणार आहे. या नागरिकांचाही शोध घेतला जात आहे, यातील काही जणांना होम कारंटाईन करण्यात आले आहे.

काल, शुक्रवारी नांदणीतील ७५ वर्षीय वृद्धाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याने नांदणी परिसर हादरला आहे. या वृद्धाच्या घरातील दोन मुलांपैकी एक मुलगा, तसेच जावई उपचारादरम्यान शुश्रूषाकरिता त्यांच्याबरोबर होते. या दोघांचेही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या वृद्धाच्या घरातील ११ अन्य सदस्यांचे तसेच नांदणीतील त्या हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांच्या घरातील चौघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER