शेतकऱ्यांना चिथावणी देणाऱ्या दिप सिद्धूवर एक लाखाचे बक्षीस जाहीर

Deep Sidhu

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी नवी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनात सहभागी होत आंदोलन चिघळवण्यासाठी आंदोलकांना चिथवणाऱ्या दीप सिद्धूसह लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणाऱ्या जुगराज सिंगवर (Jugraj Singh) दिल्ली पोलिसांनी 1 लाखाचे बक्षिस जाहीर केले आहे. दिल्ली पोलिसांनी एकूण आठ जणांवर कारवाई करण्यासाठी बक्षिस जाहीर केले आहे.

दिल्ली पोलिसानां दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताकदिनी हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर काही आरोपींवर ५० हजारांचे बक्षीस ठेवले आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत हिंसाचारात सहभागी असणाऱ्या 12 संशयित आरोपींची छायाचित्रे जाहीर केली आहेत. संशयितांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून 100 जणांना चौकशीची नोटीस धाडण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी आंदोलनातील हिंसाचाराप्रकरणी आत्तापर्यंत 44 एफआयआर दाखल केल्या असून 122 जणांना अटक केली आहे. तर 9 प्रकरणांची चौकशी गुन्हे शाखेकडून सुरू आहे. आंदोलकांनी लाल किल्ल्यावरही कब्जा मिळवला होता. तसेच धार्मिक ध्वज फडकावला होता. दिल्लीतील अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांत झटापटी झाल्या. यात पोलीस आणि आंदोलक जखमी झाले.

ट्रॅक्टर र‌ॅलीला अचानक हिंसक वळण लागले होते. काही शेतकरी मोर्चाचा नियोजित मार्ग सोडून लाल किल्ल्याच्या दिशेने गेले होते. यात दिप सिद्धूचाही सहभाग होता. पाहता पाहता आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कब्जा केला. तसेच निशाण ए साहीब हा शिखांचा धार्मिक ध्वज फडकावला. दीप सिद्धूने भडकावल्यामुळे आंदोलक लाल किल्ल्याकडे गेले असा आरोप त्यावर होत आहे.

दरम्यान, दीप सिद्धूवरून दिल्लीत राजकारण तापलं आहे. दीप सिद्धू याचा एक फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असून तो भाजप खासदार अभिनेता सनी देओल याच्या प्रचाराच्या टीममध्ये होता. त्यामुळे दीप सिद्धू हा भाजपचाच समर्थक असून आंदोलन डागाळण्यासाठी त्यानेच प्रयत्न केल्याचा आरोप शेतकरी आंदोलकांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER