दहा रुपयाच्या एका ताटात जेवत असत दिनो मोरिया आणि बिपाशा बसु

Dino Morea - Bipasha Basu

बॉलिवुडमध्ये (Bollywood) यश मिळवण्यापूर्वी दिनो मोरिया (Dino Morea) आणि बिपाशा बसु (Bipasha Basu) यांनी मॉडेलिंगच्या जगतात पाऊल ठेऊन यश मिळवले होते. तेथे यश मिळाल्यानंतर त्यांची एंट्री बॉलिवुडमध्ये झाली होती. परंतु मॉडेलिंगच्या काळात संघर्ष करीत असताना दोघांकडेही पैसे नसायचे आणि दहा रुपयांची एक थाळी घेऊन त्यात दिनो आणि बिपाशा एकत्र जेवत असत. स्वतः दिनो मोरियानेच याची माहिती दिली आहे.

90 च्या दशकात दिनो आणि बिपाशाने मॉडेलिंग आणि सिनेमात चांगले यश मिळवले होते. या दोघांचे अफेयरही सुरु होते. विक्रम भट्टच्या सुपरहिट ‘राज’ सिनेमात हे दोघे एकत्र आले होते. जवळ-जवळ पाच वर्ष त्यांचे अफेयर सुरु होते परंतु नंतर काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला. बिपाशाने काही वर्षांपूर्वी करणबरोबर लग्न केलेले आहे. बिपाशाचे लग्न झालेले असले तरी या दोघांचे अजूनही चांगले संबंध आहेत. बिपाशाबरोबरच्या मैत्रीबाबत बोलताना दिनोने सांगितले, सुरुवातीच्या काळात आमच्याकडे जेवायलाही पैसे नसायचे. त्यावेळी आम्ही दहा रुपयांची एक थाळी मागवायचो. त्यात चपाती, भात आणि डाळ मिळत असे. त्यानंतर आम्ही एक दिवस चपाती आणि एक दिवस भात खायचो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER