ममता बॅनर्जींना अजून एक धक्का, तृणमूलच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचा भाजपात प्रवेश

Dinesh Trivedi enter in bjp party

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी D(inesh Trivedi) यांनी आज नवी दिल्लीमध्ये भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P Nadda) आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या उपस्थितीत भाजपाचे (BJP) सदस्यत्व स्वीकारले.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला लागलेली गळती थांबवण्याचे लक्षण दिसत नाही. दिनेश त्रिवेदी यांनी गेल्या महिन्यात राजसभेत भाषण करताना खासदारकीचा राजीनामा देऊन ममतांना मोठा धक्का दिला होता.

दरम्यान, भाजपात गेलेले व नंदिग्राम आणि आसपासच्या भागात तृणमूलसाठी डोकेदुखी ठरू शकणारे सुवेंदू अधिकारी यांचे नंदीग्राम येथून निवडणूक लढण्याचे आव्हान ममता बॅनर्जी यांनी स्वीकारले आहे. हा मतदारसंघ सुवेंदू अधिकारी यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER