खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर ठोकणार मानहानीचा दावा

अमरावती : एका पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीचे नगरसेवक दिनेश बूब यांना लॅण्ड माफिया खलनायक म्हणून संबोधलं होत. त्यामुळं आता अडसूळ यांच्या या व्यक्तव्यामुळं आपली सामाजिक हानी झाली असून, आपण खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात लवकरच दोन कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं आयोजित पत्रकार परिषदेत नगरसेवक दिनेश बूब यांनी माहिती दिली आहे.

सोबतच अडसूळ यांनी आपल्यावर केलेला आरोप जर खरा निघाला तर आपण भविष्यात राजकारण सोडू असं ही दिनेश बूब म्हणालेत. मी जर लॅण्ड माफिया असतो तर सोमेश्वर पुसतकर यांच्यासोबत २००० मध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सन्मान केला असता का? असा सवाल ही त्यांनी अडसूळ याना खडसावून केलाय.

खासदारांचे दिल्ली येथील अनेक कारनामे आपल्याला बाहेर काढता येतील, मात्र शिवसेनेविषयी मला आदर असल्याने मी तसे करणार नाही.
शिवाय कोणत्याही शिवसैनिकाच्या हक्कावर गदा येईल, असे कार्य करणार नसल्याते बूब म्हणाले. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे
आपण तक्रार केल्याची माहिती बूब यांनी दिली.