राज ठाकरेंना नोटीस ; न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Raj Thackeray

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि अ‌ॅमेझॉन (Amazon) वाद आता चांगलाच पेटला आहे . यापार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दिंडोशी न्यायालयाकडून (Dindoshi court) नोटीस बजावण्यात आली आहे. मनसेने अ‌ॅमेझॉनविरोधात मराठी भाषेवरुन एक मोहीम सुरु केली आहे. त्यावर अ‌ॅमेझॉन न्यायालयात गेले आहे. दिंडोशी न्यायालयाकडून राज ठाकरे आणि मनसे सचिवांना नोटीस बजावण्यात आली. त्यांना 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे.

अ‌ॅमेझॉन वर मराठी भाषेचा पर्याय सुरु करावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. त्याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अ‌ॅमेझॉनकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. असे असले तरी मनसेची ही मोहीम सुरुच राहील. कारण ही मोहीम मराठी माणसांची, मराठी भाषेसाठी आहे. तसंच न्यायालयाने जी नोटीस दिली आहे. त्यावरुन आता अ‌ॅमेझॉन ला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER