अशोकस्तंभाचे चित्रकार दीनानाथ भार्गव यांचं निधन

इंदूर : अशोकस्तंभाच्या निर्मितीत मोलाचा वाटा असलेले प्रख्यात चित्रकार दीनानाथ भार्गव यांचं निधन झाले आहे. त्यांनी शनिवारी रात्री इंदूरमध्ये अखेरचा श्वास घेतलाय, असे त्यांची सून सापेक्षी भार्गव यांनी सांगितले आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून हृदयविकाराच्या त्रासाने ग्रस्त होते.

भारतीय संविधानाच्या पांडुलिपीची पाने ही भार्गव यांनी तयार केली होती. १ नोव्हेंबर १९२७ रोजी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलताई येथे भार्गव यांचा जन्म झाला होता. कला भवन शांती निकेतनचे कलागुरु नंदलाल बोस यांच्या प्रिय शिष्यांपैकी ते एक होते.