शाहरुखच्या ‘पठाण’मध्ये डिंपल कपाडियाही दिसणार

dimple pathan

हॉलिवुडचा प्रख्यात दिग्दर्शक ख्रिस्टोफर नोलनच्या टेनेट चित्रपटात डिंपल कपाडियाने (Dimple Kapadia)चांगले काम केले आहे. त्यामुळे डिंपलकडे आता बॉलिवुडच्या (Bollywood) निर्मात्यांचेही डिंपलकडे लक्ष वळले आहे. यशराजने त्यांच्या बहुचर्चित शाहरुख खान अभिनीत ‘पठाण’ चित्रपटातील एका महत्वाच्या भूमिकेसाठी डिंपलला साईन केले आहे. विशेष म्हणजे डिंपलने मंगळवारपासून या चित्रपटाचे शूटिंगही सुरु केले आहे.

शाहरुख खान, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम अभिनीत या चित्रपटातील एका महत्वाच्या भूमिकेसाठी वरिष्ठ अभिनेत्रीचा शोध सुरु होता. तो शोध डिंपलच्या रुपाने पूर्ण झाला आहे. हा चित्रपट एका गुप्तहेराच्या मिशनवर आधारित असून त्या गुप्तहेराला दीपिका पदुकोण अॅक्शन करीत साथ देताना दिसणार आहे. यशराजच्याच धूममध्ये खलनायक साकारून प्रचंड लोकप्रिया मिळवणारा जॉन अब्राहम यात खलनायकाच्या रुपात दिसणार आहे असे सांगितले जात आहे.

दीपिका पदुकोणनेही काही दिवसांपूर्वी शाहरुखसोबत ‘पठाण’चे शूटिंग सुरु केले होते. आता ती 15 डिसेंबरनंतर पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहे. जॉन अब्राहम सध्या त्याच्या सत्यमेव जयते 2’ चे लखनऊमध्ये शूंटिंग करीत असून जानेवारीत तो ‘पठाण’चे शूटिंग सुरु करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER