50 वर्षानंतर ऑडिशन दिली डिंपल कपाडियाने

Dimple Kapadia

राज कपूर (Raj Kapoor) यांनी 1973 मध्ये त्यांच्या ‘बॉबी’ चित्रपटातून डिंपल कपाडियाला (Dimple Kapadia) रुपेरी पडद्यावर आणले होते. त्या दिवसापासून डिंपल कपाडिया जी लोकप्रिय झाली ती आजतागायत आहे. आजही डिंपल अनेक चित्रपटांमध्ये दिसत असते. डिंपलने अनेक हिंदी, बंगाली चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. बॉलिवुडच्या काही इंग्रजी चित्रपटांमध्येही डिंपलने काम केले आहे. मात्र प्रथमच तिने एक हॉलिवूडपट केला आहे. ‘टेनेट’ नावाचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या वेळी डिंपलला चक्क ऑडिशन द्यावे लागले होते. स्वतः डिंपलनेची ही माहिती मुलाखतीत दिली.

ख्रिस्टोफल नोलन हा हॉलिवूडचा सगळ्यात यशस्वी दिग्दर्शक. त्याच्या चित्रपटात काम मिळणे म्हणजे भाग्याचे समजले जाते. हॉलिवुडचेही सर्व मोठे कलाकार ख्रिस्टोफर नोलनच्या चित्रपटात काम करण्यास एका पायावर तयार असतात. पण नोलान कलाकाराच्या नावाऐवजी तो कलाकार भूमिकेला सूट होतो की नाही हे पाहूनच कलाकाराची निवड करतो. आणि यामुळेच त्याने डिंपलची निवड केली.

पहिल्या हॉलिवुडपटाच्या अनुभवाबद्दल बोलताना डिंपल म्हणाली, राज कपूर यांनी जवळ-जवळ 45-47 वर्षांपूर्वी ‘बॉबी’ चित्रपटासाठी माझी ऑडिशन घेतली होती. त्यानंतर आता मी ऑडिशन दिली यापूर्वी मी कधीही हॉलिवुडच्या चित्रपटात काम केले नाही आणि काम मिळावे म्हणून कधी प्रयत्नही केले नाहीत. हा चित्रपट मला मिळणे म्हणजे गॉड गिफ्टच आहे. एक दिवस मला एका मुलीचा फोन आला. तिने सांगितले ती ख्रिस्टोफर नोलनच्या ऑफिसमधून बोलत आहे. तिने सांगितले, ख्रिस्टोफर यांच्या चित्रपटातील एका भूमिकेसाठी तुमचा विचार सुरु आहे. मात्र यासाठी तुम्हाला ऑडिशन द्यावी लागेल. ख्रिस्टोफर नोलनसारखा महान दिग्दर्शक मला कशाला त्याच्या चित्रपटात घेईल असा प्रश्न माझ्या मनात आला. त्यामुळे कोणीतरी माझी मस्करी करीत आहे असे मला वाटले. परंतु त्या मुलीने खरोखरच ऑडिशन घ्यायची आहे आणि त्यासाठी वेळ हवी असे सांगितले. मी ऑडिशन देण्यासाठी तयार झाले.

जेव्हा मी ऑडिशनसाठी गेले तेव्हा मला दोन पानांचे डायलॉग्ज दिले. ते पाहून मला हे जमणारच नाही असे मला वाटले. रिजेक्शन होणारच आहे मग प्रयत्न तरी करून पाहायला काय हरकत आहे? असा विचार करून मी ऑडिशनचा व्हिडियो बनवला आणि पाठवून दिला. त्यानंतर मला सांगण्यात आले की, स्वतः ख्रिस्टोफर नोलन मुंबईला येऊन माझी ऑडिशन घेणार आहे. स्वतः ख्रिस्टोफर नोलन माझी ऑडिशन घेणार हे एकल्यावर मला खूप आऩंद झाला असेही डिंपलने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER