अभिनेता दिलजीत दोसांझने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केली १ कोटीची मदत

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज दहावा दिवस आहे. केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या सत्राला सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत देखील शेतकरी आंदोलन करीत आहेत.

दिल्लीतील विज्ञान भवन येथे सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी काल पार पडली मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. दरम्यान, पंजाबी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटीही आता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजितसिंह दोसांझ शनिवारी सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकर्‍यांना भेटण्यासाठी पोहोचला होता.

सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वृद्ध आहेत आणि सध्या थंडीचे वातावरण आहे, हे ध्यानात घेऊन दिलजितने (Diljit dosanjh) हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या पैशांमधून शेतकरी गरम कपडे खरेदी करु शकतील.

पंजाबी गायक सिंघाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही बाब उघडकीस आणली. त्यांनी दिलजितचे आभार मानले आहेत तसेच त्याचे कौतुकही केले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER