पवारसाहेबांचा आशीर्वाद घेतला, आजच चार्ज घेणार : दिलीप वळसे-पाटील

Dilip Walse-Patil - Maharastra today
Dilip Walse-Patil - Maharastra today

मुंबई : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार मंत्री, कामगार व राज्य उत्पादन शुल्क दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यास मंजुरी दिली आहे.

यावर दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे .जबाबदारी मोठी आहे. ती पार पाडायला आवडेल. आजच दुपारी गृहमंत्रिदाचा चार्ज घेणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले, असं राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद देण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली. वळसे-पाटील यांनी अजून गृहमंत्रिपदाची अधिकृत सूत्रे स्वीकारली नाहीत.

ते आज दुपारी ३ वाजता पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज सिल्व्हर ओक निवासस्थानी येऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. मी पवारसाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतलं. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली, असं वळसे-पाटील म्हणाले. गृहमंत्रिपदाची जबाबदारी मोठी आहे. ही जबाबदारी पार पाडायला आवडेल, असं सांगतानाच आज दुपारी ३ वाजता गृहमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून जशी माढा लोकसभा मतदारसंघाची जागा काढून घेतली, तशी पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही, अशी गर्जना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button