अनिल परब चौकशीच्या फेऱ्यात; गृहमंत्री वळसे पाटलांचे मोठे विधान

Dilip Walse Patil and anil parab

पुणे :- भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे, तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग घरी गेले आहे. आता अनिल परब यांचा नंबर लागला आहे. विविध यंत्रणांकडून त्यांची चौकशी होणार आहे, राज्यपालांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परब हे फक्त दोन महिन्यांचे सोबती आहेत. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे, त्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती अटळ आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मोठे विधान करत सावध पवित्रा घेतला.

सोमय्यांनी केलेल्या दाव्याबाबत वळसे पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, अनिल परब प्रकरणी आरोप करणे हे सुरू झाले आहे. मात्र तपास सुरू असल्याने या प्रकरणी जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, असे म्हणत त्यांनी संभ्रम आणखीनच वाढवला. वळसे पाटील मंचर येथे वृक्षारोपण कार्यक्रमावेळी माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पूर्ण केलेल्या सात  वर्षांच्या कार्यावरही भाष्य केले. केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण  होत असताना आजपर्यंतच्या केंद्र व राज्यातील कामकाजात केंद्र सरकारचे अपयश आहे, त्यामध्ये केंद्र सरकारने अधिक सुधारणा करणे शक्य आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढा देण्यासाठी देश, राज्य, जिल्हा आणि तालुकापातळीची यंत्रणा सज्ज आहे, टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचा  सल्ला घेऊन उपाययोजना आखल्या जात आहेत. म्युकरमायकोसिस संदर्भात तपासणी आणि लवकर उपचार करण्यासाठी वेगळा टास्क फोर्स शासनाला मार्गदर्शन करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : अनिल परब फक्त दोन महिन्यांचे सोबती, मंत्रीपदावरून गच्छंती अटळ; सोमय्यांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button