शेवटच्या बैठकीत मधुबालाची अवस्था पाहून दिलीपकुमार झाले अस्वस्थ; या प्रेमकथेचा अंत होता खूपच दुःखद

Madhubala -Dilip Kumar

भारतीय सिनेमाचे दिग्गज अभिनेते दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पाकिस्तानच्या पेशावर येथे झाला. बॉलिवूडमध्ये ते ‘ट्रॅजेडी किंग’ आणि ‘द फर्स्ट खान’ (The First Khan) म्हणूनही ओळखले जातात. त्यांची चित्रपटात अभिनय करण्याची शैली लोकांना चांगलीच आवडली. दिलीप साहबने सायरा बानोशी लग्न केले; पण मधुबालावर (Madhubala) त्यांचे प्रेम कमी नव्हते. आज आपण हा किस्सा जाणून घेऊ. दिलीपकुमार यांनी आत्मचरित्रात कबूल केले की, त्यांना मधुबालाचे आकर्षण होते. दोघांचेही प्रेम होते; पण मधुबालाच्या वडिलांना हे अजिबात मान्य नव्हते.

आणि मग जेव्हा ‘नया दौर’ चित्रपटावरून बी.आर. चोप्रा यांच्यावर कोर्टात खटला चालला  तेव्हा दिलीपकुमार आणि मधुबालाच्या वडिलांमधील नाती अधिकच खराब झाली होती. खरं तर ‘नया दौर’चे  शूटिंग ४० दिवसांसाठी बाहेर होते; पण मधुबालाचे वडील अजिबात तयार नव्हते. दरम्यान, मधुबालाच्या जागी बी. आर. चोप्रा यांनी वैजयंतीमाला यांना साइन केले. पण ही बाब इतकी बिकट झाली की कोर्टात पोहचली.

त्यामुळे दिलीपकुमार आणि मधुबालाच्या प्रेमावरही परिणामझाला. यासह दोघांची प्रेमकथाही कोर्टात पोहचली आणि दिलीपकुमार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे समर्थन केले आणि मधुबालाविरुद्ध कोर्टात साक्ष दिली. काही दिवसांनंतर दिलीपकुमार यांनी मधुबालाला लग्न करण्यास सांगितले असता प्रकरण मिटवले. यावर ती  म्हणाली की, तुम्ही माझ्या वडिलांची माफी मागा; पण दिलीप साहब यांनी तसे करण्यास नकार दिला आणि येथून दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. असं म्हणतात की, मुगल-ए-आजम चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी ही गोष्ट इथपर्यंत पोहचली होती की, या दोघांनी अगदी जाहीरपणे एकमेकांना ओळखणेही बंद केले होते.

यानंतर दिलीपकुमार यांनी त्यांचा लाइफ पार्टनर म्हणून सायरा  बानोची निवड केली. जेव्हा शेवटच्या दिवसांत मधुबाला आजारी पडली तेव्हा दिलीपकुमार यांना भेटण्याची इच्छा तिने व्यक्त केली. ती खूप कमजोर  (Weak) झाली होती. दिलीपकुमार यांना मधुबालाची अशी अवस्था पाहून खूप दु:ख झाले. मधुबालाने दिलीप साहबच्या डोळ्यात पाहिले  आणि म्हणाली, “हमारे शहजादे को उनकी शहजादी मिल गई, मैं बहुत खुश हूं.” मधुबालाचे वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी १९६९ मध्ये निधन झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER