दिलदार महिंद्रा : कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मिळणार पाच वर्षांचा पगार आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च !

Mahindra - Coronavirus

मुंबई :- कोरोनाच्या (Corona) साथीच्या संकटात अनेक भारतीय उद्योग आपल्या कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात पुढाकार घेत आहेत. महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पाच वर्षांचे वेतन आणि वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम देण्याचे जाहीर केले आहे.

महिंद्राच्या कौटुंबिक साहाय्य कार्यक्रमांतर्गत ही मदत दिली जाणार आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शाह (Anish Shah) यांनी कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली.

मुलांच्या शिक्षणासाठी दरवर्षी दोन  लाख रुपये
कंपनीने कर्मचार्‍यांसाठी ‘फॅमिली सपोर्ट पॉलिसी’ आणली आहे. यात कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांच्या १२ वीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक मुलाला वर्षाकाठी दोन लाख रुपयांपर्यंत मदत मिळेल.

शाह यांनी २५ हजार कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीच्या काळात काही कुटुंबांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या अचानक निधनाचा सामना करावा लागला आहे, त्याच वेळी घर चालवण्याची अनपेक्षित जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. अशा वेळी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाही, तुमच्या मदतीसाठी आम्ही सज्ज आहोत.

वाहनांची वॉरंटी वाढवली
महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी वाढवली आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी १ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ दरम्यान संपणार आहे. ती मुदत आता ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच वॉरंटी पीरियड एक्सटेंशन आणि शेड्यूल मेंटेनन्स तसेच फ्री सर्व्हिसिंगची सुविधा सर्व गाड्यांवर देऊ केली आहे. ज्यामध्ये Thar SUV, Bolero, Scorpio, XUV300 या गाड्यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button