मध्यप्रदेशात काँग्रेसवर आलेले संकट दूर करण्यासाठी दिग्विजय सिंह कमलाथ यांच्या मदतीला

Digvijaya Singh and Kamal Nath

भोपाळ : काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह हे आपले सर्व कार्यक्रम रद्द करून सकाळी भोपाळ येथे पोहचले. मध्यप्रदेशात कमलनाथ सरकारवर अस्थिरतेचे वादळ घोंघावत असल्याने ते कमलनाथ यांच्यासोबत ते सरकारवाचवण्यासाठी लढा देणार आहेत. मुख्यमंत्री कमलाथ यांच्या आदेशावरून आपण येथे आलो असल्याचे दिग्विजय सिंह म्हणाले. येथे आल्यानंतर ते थेट 6, श्यामला हिल्स येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले.

मध्यप्रदेशात ऑपरेशन लोटसबाबत विचारले असता ते म्हणाले, हे ऑपरेशन लोटस नव्हे तर ‘ऑपरेशन मनीबॅग’ आहे.

त्यांना आपला भ्रष्टाचार उघडा पडेल या भीतीने ते आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचे सिंह म्हणाले. आर्थिक गुन्हे पथकाने ई-निविदा प्रकरणात चौकशी सुरु केली असून माध्यम येथे प्राथमिकी दाखल करण्यात आली आहे.

भाजप स्वत:ला चौकशीपासून वाचवण्यासाठी कितीही रक्कम खर्च करू शकते असे सिंह म्हणाले. विधानसभेच्या अर्थसकल्पीय अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे ते म्हणाले. दिग्विजय सिंह म्हणाले, असंतुष्ट काँग्रेस आमदार आणि सत्तारुढ आघाडीतील आमदारांना शांत करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. भाजपचे माजी मंत्री संजय पाठक यांनी भाजप आमदार नारायण त्रिपाठी आणि शरद कोल यांनी मुख्यमंत्री कमल नाथ यांच्या निवासस्थानी गुरुवारी मध्यरात्री दिलेल्या भेटीसंदर्भात विचारले असता दिग्विजय सिंह म्हणाले, मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष असताना संजय पाठक यांचे वडील जबलपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते माझ्या मित्राचे चिरंजीव आहे. पाठक यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला असून मुख्यमंत्री कमलनाथ यांना भेटल्याचा इन्कार केला आहे. संजय पाठक यांचे वडील सत्येंद्र पाठक दिग्विजय सिंह मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. खाणीचा व्यवसाय असलेले पाठक यांना 2014 साली लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आल्याने ते भाजपात गेले आणि मंत्री झाले.

अच्छा तर, ही गोम आहे; कमलनाथ सरकारला ज्योतिरादित्यंच्या समर्थकांची धमकी