देशात पहिल्यांदाच होणार ‘डिजिटल’ जनगणना; ३,७६८ कोटी रुपयांची तरतूद

nirmala sitharaman

दिल्ली :- देशाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच ‘डिजिटल’ स्वरूपात जनगणणना होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये ३,७६८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman)  यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना केली.

सीतारामण म्हणाल्या, मैलाचा दगड ठरणाऱ्या या कामगिरीसाठी मी यंदाच्या अर्थसंकल्पात ३,७६८ कोटींची तरतूद केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी नुकतंच जाहीर केलं होतं की, २०२१ ची जनगणना ही मोबाईल अ‌ॅपवरून होईल. डिजिटल इंडियाला प्रमोट करण्यासाठी पारंपरिक पेन आणि पेपर पद्धतीपासून दूर होण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ही बातमी पण वाचा : आमचे सरकार शेतकऱ्यांना समर्पित – निर्मला सीतारामण

जनगणनेची माहिती ही मोबाईल अ‌ॅपने गोळा केली जाणार आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच जनगणनेच्या कामामध्ये मोबाईल फोनचा वापर होणार आहे. भारत आता पेन आणि पेपरपासून डिजिटल डेटाकडे जातो आहे. ही देशातील जनगणनेच्या कामातील ही मोठी क्रांती ठरणार आहे, असे अमित शहा म्हणालेत.

या नव्या अ‌ॅपमध्ये नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबीयांची माहिती अपलोड करता येणार आहे. देशभरात १६ भाषांमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार असून त्यासाठी १२ हजार कोटी रुपयांची गरज असेल, असे शहा म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER