रुपेरी पडद्यावरील डॉनची वेगळी रुपे

Dawn on the silver screen

हिंदी चित्रपटात (Hindi movies) नायकासोबत खलनायकाची प्रचंड आवश्यकता असते. खलनायक (Dawn) नसेल तर नायकाच्या नायकत्वाची मांडणी करणे अशक्य होऊन जाते. म्हणून मग वेगवेगळ्या रुपातील खलनायक पडद्यावर साकार केला जातो. रुपेरी पडद्यावरील खलनायक हा सगळ्यात जास्त वेळा अंडरवर्ल्ड डॉन किंवा दहशतवाद्यांच्या नेता दाखवला जातो. या खलनायकाची क्रूरकर्मा इमेज तयार व्हावी म्हणून त्याला वेगळी रुपे दिली जातात. पडद्यावर अशाच काही चर्चित डॉनवर एक नजर-

प्रत्येक माणसाच्या मनात एक रावण असतो आणि तो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रुपात समोर येतो. त्यामुळे ज्याला राम मानले जाते त्याच्या मनातही कटू विचार असतात आणि ज्याला रावण समजले जाते त्याच्या मनात चांगले विचार असतात.

हीच मांडणी मणिरत्नमने आपल्या रावण चित्रपटात केली होती. अभिषेक बच्चनने खलनायकाची भूमिका साकारली होती तर दक्षिणेतील सूर्या या अभिनेत्याने नायकाची रामची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या शेवटी मणिरत्नम या दोघांमधील फरक दाखवतो आणि प्रेक्षकांना रावण कोण याचा विचार करण्यास बाध्य करतो.

रावण ही संकल्पना चित्रपटांना सुरुवात झाली तेव्हापासूनच आहे. सुरुवातीच्या काळात के. एन. सिंह रुपेरी पडद्यावर आघाडीचे डॉन होते. त्यांचे डोळे हेच त्यांचे बलस्थान होते.

डोक्यावर हॅट, तोंडात सिगारेट आणि शिटी वाजवत दुश्मनांचा खात्मा करणारा असा हा खलनायक 1938 च्या बागवानपासून 1981 च्या कालियापर्यंत डॉनगिरी दाखवत होता. हा डॉन खराखुरा डॉन असे. सभ्य इमेजच्या मागे राहून तो खलनायकगिरी करीत नसे.

यानंतर सुरुवात झाली ती सभ्यतेच्या बुरख्याआड खलनायकी करणाऱ्या रावणाची. यात आघाडी घेतली होती ती प्रख्यात अभिनेते अजीत यांनी. त्यांचा मोना डार्लिंग, सोना कहां है, सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है सारखे संवाद आजही आठवले जातात. सुरुवातीला घोड्यावर बसून दरोडे घालणाऱ्या अजीत यांनी नंतर आधुनिक जगात येत सभ्य खलनायकाची भूमिका साकारण्यास सुरुवात केली. हा अत्यंत स्टायलिश असा डॉन होता आणि प्रेक्षकांनाही तो भावला होता. त्या काळात आजच्या सारखे मीम्स तयार होत असते तर अजीत यांच्यावर प्रचंड मीम्स तयार झाले असते आणि त्यांनी यात पहिला क्रमांक नक्कीच पटकावला असता.

सभ्य बुरख्याआडच्या डॉननंतर पडद्यावर अवतरला फॅमिली डॉन. हॉलीवुडच्या गॉडफादरवर आधारित बॉलिवुडमध्येही गॉडफादर पडद्यावर आले. आपल्या कुटुंबासाठी काहीही करण्यास आणि कोणत्याही थराला जाण्यास तयार असलेले हे डॉन फार कमी वेळा स्वतः हातात बंदूक घेऊन गुन्हे करीत. त्यांच्या हाताखाली असलेल्यांकडून ते सर्व गुन्हे करून घेत असता. फिरोज खानने 1975 मध्ये धर्मात्मामध्ये प्रेमनाथ यांना असा डॉन बनवला होता. त्यानंतर रामगोपाल वर्माचा सरकार किंवा नायकांचे बदलापट हे या गॉडफादर डॉनचीच नक्कल असायची. मग तो अग्निपथ असो, दीवार असो वा अन्य एखादा चित्रपट. फक्त फरक एवढाच होता की या चित्रपटात त्याला नायकाचे रूप देण्यात आले होेते. होती.

यानतंर वास्तव डॉनना पडद्यावर आणण्यास सुरुवात झाली. प्रख्यात मटका किंग रतन खत्रीच्या जीवनावर 1975 मध्ये रंगिला रतन चित्रपट बनवण्यात आला. ऋषी कपूर यांनी यात मुख्य भूमिका साकारली होती. तर काही वर्षांनी कमल हसन यांनी माटुंग्याचा भाई वरदा राजनच्या जीवनावर नायकन चित्रपट काढला. फिरोज खान यांनी नंतर याच नायकनला दयावान बनवून हिंदीमध्ये आणले. विनोद खन्ना यांनी दयावानची भूमिका केली होती. हे डॉन समाजासाठी गुन्हेगारी करताना दाखवले होते.

यानंतर तर निर्मात्यांनी डॉनला डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है म्हणत पळपुट्या डॉनच्या रुपात दाखवण्यास सुरुवात केली. चंद्रा बारोट यांनी 1978 मध्ये अमिताभला असा डॉन बनवले. त्यानंतर शाहरुखने याची रिमेक करीत दोन वेळा अशा डॉनची भूमिका साकारली.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या जीवनावरही अनेक चित्रपट तयार झाले. विशेष म्हणजे त्याचे आज जे रुप आहे तेच चित्रपटात दाखवण्यात आले. परंतु तो किती शक्तिशाली आहे हे दाखवण्यास मात्र निर्माते विसरले नाहीत. आजचे खलनायक हे आता आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचे प्रमुख झाले आहेत. यात मसूद अझरपासून अनेकांचा समावेश आहे. त्यामुळे खलनायकाचे रुप आता बदलले असून तो खराखुरा खलनायक कसा आहे तेच दाखवले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER