बिहार प्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींची वेगळी जनगणना करा,भुजबळांच्या मागणीला फडणवीसांचेही समर्थन

Chhagan Bhujbal And Devendra Fadnavis

मुंबई : महाराष्ट्रातील ओबीसींच्या वेगळ्या जनगणनेसाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका घेतल्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्यात इतर मागास वर्गाची (ओबीसी) वेगळी जनगणना करण्यात यावी, अशी मागणी शुक्रवारी विधानसभेत केली.

या पती – पत्नीमुळेच महाविकास आघाडी स्थापन झाली !

भुजबळ म्हणाले, बिहार राज्याच्या विधीमंडळात ज्याप्रमाणे जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींची वेगळी जनगणना करण्यात यावी. जणगणनेच्या अर्जामध्ये याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत, ते खूपच किचकट आणि अनावश्यक आहेत. त्यामुळे या अर्जामध्ये बदल करुन फक्त एकच प्रश्न त्यात समाविष्ट करण्यात यावा.

तसेच, याबाबत सभागृहात केवळ ठराव मांडून विषय सोडून देणं योग्य नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेत्यांनी याबाबत लक्ष घालावं, अशी मागणीही यावेळी भुजबळ यांनी केली.

दरम्यान, ओबीसींच्या वेगळ्या जनगणनेला भाजपाचंनही समर्थन दिलं आहे. “भुजबळांनी मांडलेला विषय अत्यंत महत्वाचा आहे. याबाबत सर्वांनी मिळून पंतप्रधानांकडे विनंती करायला हवी. अशा प्रकारे ओबीसींसाठी जर वेगळी जनगणना झाली तर ओबीसींसाठी विविध कल्याणकारी योजना राबवणं सोपं जाईल.” असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.