व्याधीनुसार पथ्याहार – आयुर्वेदाची विशेषता !

Ayurveda - Maharastra Today

कोणताही आजार असो आयुर्वेद तज्ज्ञाकडे गेलात की पथ्य अपथ्य नक्कीच सांगितले जाते. आयुर्वेदाच्या दृष्टीने आहाराला चिकित्सेच्या दृष्टीने औषधा एवढेच महत्त्व दिले आहे. व्याधीच्या अनुषंगाने आहारात बदल केला की चिकित्सा लवकर सफल होते व रोग दूर होतो. कधी कधी फक्त आहारात बदल हिच एक चिकित्सा ठरते. उदा. ताप आल्यास सुरवातीलाच लंघन, मूगाचे कढण, सुंठ जल घेणे यानेच ज्वर कमी होतो.

बघूया व्याधी व त्यानुसार पथ्य अपथ्य आहार – मूत्राश्मरी –

काय घ्यावे – जुना तांदूळ, कुळीथ, मूग, पांढरा कोहळा, पत्र शाक, शेवगा, यव, गहू, आले, उसाचा रस, मेंढीचे दूध / ताक काय घेऊ नये – वांगे, टमाटे, पालक, विरूद्धाहार, अम्लीय पदार्थ.

कास ( खोकला )

काय घ्यावे – जुना तांदूळ, गहू, यव, मूग, बथुआ, मकोय, मनुका, वेलची, आलं, कोष्ण जल, काळे मिरे, सुंठ, मध. भाकरी, सुरण, मेथी, कारले, करटोली, लसूण पुदीना चटणी, विड्याचे पान. काय घेऊ नये – बटाटा, कंद वर्ग भाज्या, थंड पदार्थ, कोरडे रुक्ष पदार्थ. थंड फळे, दही, तेलकट तूपकट पदार्थ.

दमा – काय करावे – थंडीपासून जपावे, उबदार कपडे घालणे, तुळस दालचिनी सुंठ. १ वर्ष जुने धान्य, बाजरी जोंधळ्याची भाकरी, पडवळ, कारले, दूधीभोपळा, मेथी, नवलकोल, वांगी, तांदूळजा, सुरण. गरम पाणी, साळीच्या लाह्या, लसूण, आद्रक, मिरे.

काय घेऊ नये – मका, बेसन, उडद, बासुंदी वगैरे दूधाचे पदार्थ, थंड पेये, कलिंगड, केळी, काकडी, पेरू इ. दही, म्हशीचे दूध.

अम्लपित्त –

काय घ्यावे – यव, जुने धान्य, मूग, पाणी बेताने प्यावे, दूधी भोपळा, पडवळ, घोसाळी, साखर तूप, दूध, आवळा, आमसूल चटणी, पिकलेला आंबा, डाळींब.

काय घेऊ नये – आंबट तिखट पदार्थ, पोहे कुळीथ तुरीची डाळ, मसाले, पालेभाज्या, तेलकट पदार्थ, चहा कॉफी फास्ट फूड. अति पाणी पिणे टाळावे. अशाप्रकारे चिकित्सा करतांना आहाराचा विचार महत्त्वाचा ठरतो. पथ्यापथ्य संकल्पना खूप उपयोगी ठरते.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER