आज पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले

Diesel Price Hike

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी ७ जूनपासून सुरू केलेला दरवाढीचा सपाटा सलग १९व्या दिवशी सुरूच आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १४ ते १५ पैशांनी वाढल्या आहेत. १९ दिवसांत पेट्रोल ८.६६ रुपये तर डिझेल १०.३९ रुपयांनी महागले आहे. दिल्लीत डिझेल ८० रुपयांवर गेले आहे.

दिल्लीत गुरुवारी पेट्रोल ७९.९२ रुपये झाले. तर डिझेलमध्ये आज १४ पैशांची वाढ झाली. या दरवाढीने राजधानीत पहिल्यांदाच डिझेलच्या किमती ८० रुपयांवर गेल्या आहेत. आज दिल्लीत डिझेलचा भाव ८०.०२ रुपये झाला. बुधवारी तो ७९.८८ रुपये होता. कोलकात्यात आज पेट्रोल ८१.६१ रुपये आहे. तर चेन्नईत पेट्रोलचा दर ८३.१८ रुपयांवर गेला आहे. त्यात १७ पैशांची वाढ झाली. कोलकात्यात डिझेल ७५.१८ रुपये झाले आहे. तर चेन्नईत डिझेलने ७७.२९ रुपयांचा स्तर गाठला आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये इंधनाचा दैनंदिन आढावा तात्पुरता बंद होता. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्याने ७ जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजची दरनिश्चिती पुन्हा सुरू केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER