डिझेलचे दर उच्चांकी स्तरावर

Petrol - Diesel

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.१९) पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात वाढ करण्यात आली. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर २५ पैशानी वाढून ८५.२० रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर ७५.३८ रुपयांवर गेले.

जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर ५५ डॉलर्सच्या आसपास स्थिर असले तरी तेल कंपन्यांकडून इंधन दरात वाढ सुरूच आहे. ताज्या दरवाढीनंतर मुंबईमध्ये पेट्रोलचे प्रती लीटरचे दर ९१.८० रुपयांवर तर डिझेलचे दर ८१.१३ रुपयांवर गेले आहेत. मुंबईमध्ये डिझेलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर आहेत.

तामिळनाडूतील चेन्नई येथे पेट्रोल, डिझेलचे दर क्रमश ८७.८५ रुपये आणि ८०.६७ रुपयांवर गेले आहेत. कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये हेच दर क्रमश ८८.०७ आणि ७९.९४ रुपयांवर गेले आहेत तर प. बंगालमध्ये इंधन दर क्रमश ८६.६३ रुपये आणि ७८.९७ रुपयांवर गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER