वीर भगतसिंगांना वाचवण्यासाठी महात्मा गांधींनी काहीच केलं नव्हत का?

Veer Bhagat Singh - Mahatma Gandhi - Maharastra Today
Veer Bhagat Singh - Mahatma Gandhi - Maharastra Today

गांधी आणि भगत सिंग, भारतीयत स्वातंत्र्य चळवळीतले दोन नायक. ज्यांनी आप आपल्या तत्व, निष्ठा आणि विचारधारेला स्मरुन स्वातंत्र्याचा लढा उभारला. समाजमाध्यमांवर नेहमी गांधी आणि भगतसिंग यांच्या नावाचा एकत्रित प्रयोग नेहमी एक प्रश्न विचारण्यासाठी केला जातो. ‘भगतसिंगची फाशी रोखायला गांधींनी का प्रयत्न केले नाहीत?’

भगतसिंगांच्या फाशीबद्दल गांधींच हे मत होतं

२४ मार्च १९३१ च्या दिवशी भगतसिंगांना फाशी दिल्यानंतर पुढच्याच दिवशी गांधी कराचीच्या ‘मालीर रेल्वे स्टेशन’वर पोहचले. तेव्हा लाल कुर्ता परिधान केलेल्या युकवकांनी काळ्या कापडापासून बनवलेली फुलाची माळ गांधींच्या गळ्यात घातली. तेव्हा स्वतः गांधी उद्गारले होते. “काळ्या कपड्याचे बनलेले हे फुल तीन नौजवनांच्या राखेचे प्रतिक आहेत.” २६ मार्चला गांधी पत्रकाराच्या प्रश्नांना सामोरे गेले. तेव्हा एका प्रश्नाला उत्तर देताना गांधी म्हणाले होते, “भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांच्या फाशीच्या शिक्षेत मी बदल करु शकलो नाही म्हणून माझ्या गळ्यात या मुलांनी काळ्या कापडी फुलाच्या माळा घातल्या. त्यांना माझ्यावर फुलं फेकता आली असती; पण त्यांनी माझ्या हातात फुलं दिली. मी कृतज्ञतापुर्तवक फुलांचा स्वीकार केला. ‘गांधीवादाचा नाश होवो.’ आणि ‘गांधी परत जा.’ असे नारे त्यांनी लगावले. त्यांच्या आंदोलनाला आणि रागाला मी योग्य मानतो.”

गांधींनी विरोधाला स्वीकारलं आणि पुढं म्हणाले, “आत्म दमन आणि घाबरटांनी भरलेल्या या देशात आपल्याला इतकं साहस आणि बलिदान मिळू शकत नाही. भगत सिंग यांच साहस आणि बलिदान मला नतमस्तक व्हायला लावतं. माझ्या तरुण बांधवांना नाराज न करता मला सांगायचं की देशाला नम्र, सभ्य आणि अहिंसक साहस हवंय. जे कुणाला कसलीही इजा न करता क्षणार्धाचा विचार न करता फाशीवर चढेल.”

कानपूरात दंगल उसळली

भगसिंगांच्या आदर्श आणि क्रांतीकारी विचारांची गांधींना जाण होती. शेतकरी आणि मजूरांच्या प्रति भगतसिंगांची आणि त्यांच्या साथीदारांची कटिबद्धता वाखणन्या जोगी होती; पण ब्रिटीशांचा विरोध हा अहिंसक मार्गानेच व्हावा असं गांधींच मत होतं. ‘नौजवान भारत सभेला’ उद्देशून गांधींजी कराचीत म्हणाले होते. “त्या तरुणांना मला सांगायचं की त्यांच्या जन्माच्या खुप आधीपासून मी शेतकरी आणि मजूरांची सेवा करत आलोय. मी त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या सुख दुखात मी सहभाग घेतलाय. जेव्हापासून मी त्यांच्या सेवेच व्रत घेतलंय तेव्हापासून माझं शीर मी मानवजातीला अर्पण केलंय.”

भगतसिंगांच्या फाशीनंतर कानपूरात दंगल उसळली. त्या संदर्भात गांधींनी विधान केलं होतं की “वर्तमानपत्रातून समजतं की भगतसिंग यांच्या बलिदानामुळं कानपूरचे हिंदू वेडे झालेत, भगतसिंगांच्या सन्मानासाठी दुकान बंद न करणाऱ्यांना धमकवू लागलेत. मला विश्वास आहे की भगतसिंगांची आत्मा कानपूरची ही परिस्थीती पाहत असतील तर त्यांच्या आत्म्याला प्रचंड दुःख होत असेल.”

भगतसिंगांच्या फाशीच्या एक महिनाआधी गांधींनी घेतली होती व्हाइसरॉयची भेट

भगतसिंगांना फाशी व्हायच्या आधी फेब्रुवारी महिन्यात गांधींनी भारताच्या व्हाइसरॉयची भेट घेतली होती. त्यांनी भगतसिंगाना फाशी देण्याचा निर्णय ब्रिटीशांनी घेऊ नये अशी मागणी व्हाइसरॉय यांच्याकडं केली होती. ते म्हणाले होते, “भगतसिंग हा धाडसी मुलगा आहे. त्याचं डोकं ठिकाण्यावर नाही; पण मृत्यूदंड वाईट गोष्ट आहे. त्याला सुधारणेची एक संधी द्यावी. मानवतेच्या दृष्टीकोनातून हीच गोष्ट तुमच्यासमोर ठेऊ शकतो. देशात उगाच वादळ उठेल. तुम्ही फाशीची शिक्षा रद्द करा.” पण याचा काहीच उपयोग झाला नाही.

भगतसिंग यांच्याबद्दल ब्रिटीशांना खुप गैरसमज होते. क्रांतीकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप घेणारा मोठा मध्यमवर्ग भारतात होता. उग्र आंदोलनाला इंग्रजांचा आधीपासूनच तीव्र विरोध होता. १८५७च्या उठावानंतर त्यांनी सशस्त्र आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी शक्यत्या सर्व उपाय योजना केल्या होत्या. नेहरु, पटेल आणि मालवीयांपासून ते तेजबहादूर सप्रुपर्यंत सर्वांनी भगतसिंगांची फाशी रोखली जावी यासाठी प्रयत्न केले होते.

भगतसिंगा यांच्या फाशीबद्दल गांधींचे विचार त्यांनी लिहलेल्या लेखात दिसून येतात, गांधींनी लिहलं होतं, “वीर भगत सिंग आणि त्यांच्या दोन साथीदारांना फाशी झाली. त्यांच्या देहाला वाचवण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. ते वाचतील अशी आशा ही निर्माम झाली होती पण अंतिमतः दुर्दैवच बलवत्तर होतं. भगतसिंग आहिंसेचे पुजारी नव्हते पण हिंसेला ते धर्म मानत नव्हते. अन्य उपाय नव्हते म्हणून ते खुन करायला तयार झाले. ” भगतसिंहांच शेवटचं पत्र असं होतं, “लढता लढता मला अटक करण्यात आलंय. मला फाशी दिली जाऊ नये. मला गोळी घाला, तोफेच्या तोंडी द्या. ” या वीरांनी भयाला जिंकलं होतं. त्यांच्या बिलदानाला नमन.

गांधी अहिंसेचे पुजारी होते. त्यांचा हिंसेल विरोध होता. भगतसिंहाचा वैचारिक स्तर सर्वोच्च होता. वीस एक वर्षाच्या त्या तरुणानं संपूर्ण भारतात क्रांतीची लाट आणली. माणसाच्या आर्थिक, समाजिक आणि राजकिय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भगतसिंगांच्या विचारांमध्ये आजही तितकचं तेज आहे.

Disclaimer : -‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button