रेल्वेचे ‘कन्फर्म’ तिकीट मिळाले नाही ? ‘तत्काळ’च्या भाड्यात जा विमानाने !

train & Aeroplane

मुंबई : लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाचे तिकीट कन्फर्म झाले नाही, तर रेल्वेच्याच ‘तत्काळ’च्या तिकीट दरात प्रवाशांना विमान प्रवास करता येणार आहे. हा उपक्रम तीन मित्रांनी स्थापन केलेला स्टार्टअप ‘रेलोफाय’चा आहे.

यासाठी ‘रेलोफाय’ ७ कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. यामुळे दरवर्षी कोट्यवधींच्या प्रवाशांची सोया होणार आहे, असा दावा या कंपनीने केला आहे. यासाठी रेल्वेचे तिकीट काढल्यानंतर ‘रेलोफाय’ अॅपवर तिकिटाचा पीएनआर नंबर टाकायचा आणि ‘ट्रॅव्हल गॅरंटी फी’ (रजिस्ट्रेशन शुल्क) भरायचे. प्रवासाच्या दिवसापर्यंत तिकीट ‘कन्फर्म’ झाले नाही तर रेल्वेच्या ‘तत्काळ’ तिकीटाइतके पैसे भरायचे. पुढच्या २४ तासांत त्या तिकिटावर विमानाने प्रवास करता येईल.

यात फायदा असा आहे की विमान सुटण्याच्या शेवटच्या दिवशी विमानाच्या तिकीटाचे दर खूप जास्त, सर्वसामान्यांना न परवडणारे असतात. मात्र आता रेल्वेच्या तिकीटदरात विमान प्रवास करायला मिळण्याची संधी आहे!

मुंबईतल्या रोहन देढिया, रिषभ संघवी आणि वैभव सराफ या आयआयटी, आयआयएमच्या उच्चशिक्षित तरुणांची ही संकल्पना आहे. भारतात सर्व मिळून विमानात दररोज जवळपास ५० हजार सीट रिकाम्या असतात. याच सीट कमी पैशात रेल्वे प्रवाशांना मिळाल्या, तर त्यातून रेल्वे प्रवाशांचा आणि विमान कंपन्यांचाही फायदा होईल, अशा संकल्पनेतून हे अॅप तयार करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER