सायकल ते ग्रामोफोनपर्यंतच्या व्यवसायाचा पाया रोवणारे पहिले भारतीय आंत्रप्रेन्युअर तुम्हाला माहितीयेत का?

Hemendra Mohan Bose - Maharashtra Today

पूर्वजांची आठवण नेहमी त्यांच्या त्याग आणि बलिदानासाठी काढली जाते. आजचा समाज जिथं उभा आहे तिथं पोहचण्यासाठी पुर्वजांच्या योगदानाची मोठी भूमिका असते. भारतात आज उद्योग व्यवसायांनी मोठी झेप घेतलीये. सर्व प्रकारची उत्पादनं भारतात बनवली जातात. पण एक उद्योजक असा होता ज्यानं केलेल्या धाडसामुळं आज भारतीय अर्थव्यवस्था सक्षम बनली.

हेमेंद्र मोहन बोस. (Hemendra Mohan Bose) एक असं नाव ज्यानं महात्मा गांधींच्या स्वदेशी आंदोलनाशी (Swadeshi Movement) स्वतःला फक्त जोडून घेतलं नाही तर त्या दिशेनं पावलं टाकली. भारतातली पहिली सायकल, ग्रामोफोन आणि बंगालमधील प्रसिद्ध तेल आणि पर्फ्यूम बाजारात आणून भारतीय उद्योजकांपुढं आदर्श निर्माण केला.

बंगालचा मयमनसिंग जिल्हा जो आता बांग्लादेशात येतो. तिथल्या जयसिद्धी गावात १८६४ ला एच. बोस यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांचा अभ्यासात विशेष रस होता. विज्ञानात रुची होती. महान वैज्ञानिक जगदिशचंद्र बोस त्यांचे मामा होते. त्यांच्याच मार्गदर्शनानंतर बारावीची परिक्षा पूर्ण करुन वैद्यकिय महाविद्यालयात बोस यांनी प्रवेश घेतला.

एकदा प्रयोगशाळेत प्रयोगावेळी त्यांच्या डोळ्यात अॅसिडचा थेंब उडाला. यानंतर सलग सहा महिने उपचार घेतल्यानंतर त्यांची नेत्रदृष्टी परत आली. पण नंतर त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी अनफिट असल्याचं सांगितलं गेलं. वैद्यकिय शिक्षणाचा प्रवास तिथंच थांबला.

उद्योगात उडी

पण बोस यांना पराभव स्वीकारणं पसंद नव्हतं, त्यांनी स्वतःच्या सफलेतेचा मार्ग बनवण्याचा निर्णय घेतला, काही न काही अविष्कार त्यांना बाजारात आणायचा होता. त्यांच्या अथक परिश्रमामुळं बोस यांनी बोस पर्फ्यूम बाजारात आणला. ते वर्ष होतं १८९४. १८९०पासून त्यांचे प्रयोग सुरु होते. कलकत्यात त्यांनी परफ्यूम बनवायला सुरुवात केली.

‘दिलखुश’ या नावाचा ब्रँड त्यांनी बाजारात आणला. हळू हळू त्यांचा पर्फ्यूम देशासह विदेशातही मोठा ब्रंड म्हणून नावारुपाला आला. पहिल्याच व्यवसायत आलेलं यश ध्यानात घेवून त्यांनी नव्या कंपन्या आणि कारखाने सुरु करण्याच निर्णय घेतला. तेल बनवण्याच्या क्षेत्रात ते उतरले. बंगालमधील प्रसिद्ध ‘कुंतालीन ऑईल’ची सुरुवातही त्यांनीच केली.

यानंतर कलात्मक व्यवसायात ते उतरले. ध्वनी मुद्र, छाया चित्रण, प्रिटींग प्रेस आणि सायकल उद्योगात त्यांनी रुची दाखवली.

प्रिंटींग प्रेस आणि पुरस्कार

२०व्या शतकाच्या सुरुवातीच्याच वर्षी त्यांनी ‘कुंतालिन प्रेस’ नावानं प्रिंटींग प्रेसला सुरुवात केली. या व्यवसायातून बंगलाच्या नव्या दमाच्या लेखकांना प्रोत्साहन देता येईल हा त्यांचा उद्देश्य होता. रविंद्रनाथ टागोरांना सोबत घेवून त्यांनी ‘कुंतालिन पुरस्करा’ सुरु केला. बंगालचा साहित्य क्षेत्रातला पहिला पुरस्कार आजही वितरीत केला जातो.

भारतीयाची पहिली सायकल कंपनी

बोस यांना सायकल चालवण्याचा छंद होता. ते स्वतः सायकल चालवायचेच पण मित्रांना, पाहूण्यांनाही सायकल शिकावायचे. १९०३ला त्यांनी भावासोबत मिळून पहिली सायकल कंपनी उभारली. पहिल्या भारतीय सायकल कंपनीचा मालक होण्याचा मान त्यांनी मिळवला.

भारतीय ध्वनीमुद्रण व्यवसायाचे जनक

त्यांनी ध्वनीमुद्रण व्यवसायाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. १९०२ला त्यांनी पहिल्यांदा बोस यांचा ग्रामोफोन खरेदी केला. आणि छंद म्हणून जवळचे मित्र आणि नातेवाईकांचा आवाज रेकॉर्ड करायला सुरुवात केली. नंतर ध्वनीमुद्रणात त्यांना आवड निर्माण झाली की त्यांनी कलकत्त्यातला पहिला रेकॉर्डींग स्टुडीओ सुरु केला. त्यांनी फ्रांसच्या सिनेमांशी आणि चार्ल्स पॅथसारख्या दिग्गज व्यावसायिकांसोबत काम करायला सुरुवात केली.

त्यांच्या ‘एस बोस स्वदेशी रेकॉर्ड्स’ या ब्रँडची भारतीय स्वतंत्रता आंदोलनात मोठी भूमिका राहिली. पुढं इंग्रजांच्या नजरेत ही गोष्ट आल्यावर त्यांनी कंपनीला ताळं ठोकलं. २६ ऑगस्ट १९१६ला त्यांनी वयाच्या ५२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER