राजकीय पक्षांकडून ऑफर मिळाली का? संभाजीराजे दिले ‘हे’ उत्तर

sambhaji raje chhatrapati

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द ठरवले आहे.यापार्श्वभूमीवर मराठा समाजाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे . आता आरक्षणाच्या लढ्यासाठी भाजप खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत.यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला .

कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला वंदन करून महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संभाजीराजेंनी दौऱ्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर संभाजीराजे यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले . राजकीय पक्षांकडून तुम्हाला काही ऑफर येत आहे का असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, मला अशी कोणतीही ऑफर आली नाही, मी पहिल्यांदाच असं काही ऐकत आहे. जर काही ऑफर आली तर मला सांगा’, अशी मिश्किल प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली.

दरम्यान आंदोलन करणे हा भाग आहे, मात्र यातून मार्ग काय काढता येईल हे देखील पाहणे महत्वाचे आहे. कोरोनामुळे आंदोलन करणे चुकीचे आहे. सर्वांनी आपली तब्येत सांभाळून आंदोलन करायचे आहे, मराठा समाजाचा उद्रेक असे सुद्धा कुणी म्हणू नये, असं आवाहनही संभाजीराजे यांनी केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button