‘कधी टरबूज-खरबूजची सोसायटी चालवली का?’ अजितदादांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

Ajit Pawar - Chandrakant Patil

पंढरपूर : चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि भाजपच्या (BJP) नेत्यांना ग्रामीण भागाच्या विकासाबाबत काहीही देणेघेणे नाही. चंद्रकांत पाटील हा मोदीलाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे. त्यांनी कधी टरबूज-खरबूजची सोसायटी चालवली का? त्यांना संस्था किंवा साधी सोसायटी चालवण्याचाही अनुभव नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. ते बुधवारी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या शिवाजी चौकातील प्रचारसभेत बोलत होते.

यावेळी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली. चंद्रकांत पाटील यांनी कधी कुठलीही संस्था काढलेली नाही, कुठलीही बँक किंवा कारखाना हाताळलेला नाही, कुठलीही विकास सोसायटी किंवा मजूर सोसायटी चालवलेली नाही. टरबूज-खरबूज सोसायटी कधी काढली नाही. त्यांना ग्रामीण भागाच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नाही. नरेंद्र मोदी (Narendra Modi) साहेबांच्या नावाचा झंझावात आल्यामुळे त्यांना लॉटरी लागलेली आहे. ही गोष्ट पंढरपूरच्या मतदारांनी समजून घ्यावी. शेतकरी आणि गोरगरिबांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भगीरथ भालके यांना प्रचंड मताधिक्याने विधानसभेवर निवडून पाठवा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

या प्रचारसभेत अजित पवार यांनी पुन्हा एकदा ‘चंपा’ या संबोधनावरून चंद्रकांत पाटील यांना डिवचले. अजित पवार म्हणजे अप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो. हे कुणी जरी आले, तरी तुम्ही त्यांचं काहीही ऐकू नका. ते टीकाटिप्पणी करतील. पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी पंढरपूरच्या मतदारांना केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button