‘मोदींवर टीका करणाऱ्यांनी काल-परवा casual leave घेतली होती का?’ – सलील कुळकर्णी

Salil Kulkarani-PM Modi

पुणे : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपण सर्व सोबत आहोत हा संदेश देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ५ मिनिटे सर्व भारतीयांनी घरातील लाइट बंद करुन दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी पेटवण्याचे आवाहन केले. मोदींच्या भाषणाव्रत जनतेमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी मोदींवर टीका केली. मोदींवर टीका करणाऱ्यांना गायक सलील कुळकर्णी याने देशात गेल्या दोन दिवसात घडलेल्या घटनांबाबत तोंड शिवून बसलेल्यांना ‘मोदींवर टीका करणाऱ्यांनी काल-परवा casual leave घेतली होती का?’ असा टोमणा मारला आहे.

सलीलने प्रश्न केला आहे – ‘पंतप्रधान मोदींवर आज टीका करणारे दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमातील गर्दीविषयी आणि इंदूरमध्ये डॉक्टर आणि परिचारिकांवर हल्ला करणाऱ्यांविषयी का बोलत नाहीत. तेव्हा कुठे गेले होते हे टीका करारे लोक? , असं त्याने स्पष्ट शब्दांत विचारलं आहे. विशेष म्हणजे त्याने कोणाचंही नाव न घेतला हा टोला लगावला आहे.

‘मेणबत्ती लावून काय होणार वगैरे खरे आहे. पण आज ह्यावर एकदम तर्कशुद्ध बोलणारे विद्वान दिल्लीत हजारोंची गर्दी जमली, त्यांनी नंतर डॉक्टरांना मारले. ..इंदोरमध्ये डॉक्टर आणि नर्सेस वर हल्ला झाला तेव्हा इतके शांत का होते ? का त्यांनी नेमकी काल परवा fb war casual leave घेतली होती ? का त्यांना दोन दिवसात double झालेला नंबर आणि त्यामागचे कारण हे खटकलं नाही आहे ? Really ?’

सलील कुळकर्णीने फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिवे लावताना कोणीही एकत्र यायचे नाही. सोशल डिस्टसिंग तोडायचं नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टसिंग हा एकमेव उपाय आहे, असं सांगितलं. विशेष म्हणजे २२ मार्च रोजी जनता कर्फ्युदरम्यान अनेकांनी सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन केले होते. त्यामुळे यावेळी मोदी यांनी जाणीवपूर्वक ही गोष्टी नागरिकांच्या लक्षात आणून दिली आहे.