टीआरपी प्रकरणातही ‘त्यांनी’ खंडणी वसूल केली होती का? आशिष शेलार यांचा टोमणा

Ashish Shelar

मुंबई : मुंबईत गाडीत स्फोटक सापडल्याच्या प्रकरणात मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. आता वाझे यांच्यावर खंडणी उकळल्याचे आरोप भाजपाचे नेते नितेश राणे यांनी पत्रपरिषदेत केलेत. यावर भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टोमणा मारला – टीआरपीप्रकरणातही ‘त्यांनी’ खंडणी वसूल केली होती का?

सचिन वाझे यांनी टीआरपी घोटाळाप्रकरणाची चौकशी केली होती. ते प्रकरण खूप गाजले होते. त्या संदर्भात  केलेल्या ट्विटमध्ये शेलार म्हणालेत, ‘या ‘एन्काउंटर स्पेशल’ अधिकाऱ्याने टीआरपी प्रकरणाचा तपास करतानाही अशीच खंडणी वसूल केली होती का? त्याही प्रकरणात मीडिया हाऊसकडून वसुली केली होती का? कुणाच्या जोरावर मीडिया हाऊसकडून वसुलीचे बळ आले? कोण आहेत पडद्यामागचे सूत्रधार? सत्य समोर यायला हवे!’ या संदर्भात उल्लेखनीय आहे की, न्यायालयाने सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

पोलीस विभागाने त्यांना निलंबित केले आहे. एनआयएच्या तपासातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीमुळे सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्या असताना राजकीय वर्तुळातदेखील मोठा गदारोळ सुरू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER