नानासाहेब पेशव्यांचा खजिना गायब झाला की इंग्रजांनी लुटला?

Maharashtra Today

भारताचा इतिहासात आढळणारा उल्लेख हा ऐश्वर्य संपन्नतेचा आहे. भारतातील श्रीमंतवर अनेक जण भाळले आणि भारताची ओळख भारतासाठी समस्या बनली. अनेक परदेशी सम्राटांनी भारत लुटण्याच्या उद्देश्याने भारतावर आक्रमण केलं. भारतातले राजे राजवाडे आणि प्रदेश धनसंपन्न होते. आजही देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी खोदकामात भारताच्या जुन्या ऐश्वर्य संपन्न इतिहासाची साक्षं मिळतात.

इंग्रजांनी भारत सोडण्याचा आधी २०० वर्ष भारताला लुबाडलं. परिणामतः राजमहाल फक्त खंडहर म्हणून उरले. खजान्यांच्या फक्त अफवाचं भारतात उरल्या. तिथं आजही खोदकाम होतं तर जुनी हत्यारे, अवजारे, बेकार गोष्टी आढळतात. खजिना कुठं आहे याचा पत्ता कुणालाच लागलेला नाही. भारतात खजिन्याशी जोडल्या गेलेल्या अनेक कथा आहेत. अनेक शुरवीर सैनिकांशी खजान्याविषयीच्या दंत कथा जोडल्या गेलेल्या आहेत. यापैकीच एक नाव आहे ‘नानासाहेब पेशवे’ ( Nanasaheb Peshwa)आणि त्यांचा खजिना

रातो रात गायब झाले नानासाहेब

नानासाहेबांबद्दल इतिहासात अनेक शक्यतांना वाव आहे. त्यांच्याबद्दल आजही अनेक अफवा आहेत. सर्वांचीच उत्तर मिळणं निव्वळ अशक्य. १८६७ च्या क्रांतीवेळी इंग्रजांची झोप नामोहरम करणारे नानासाहेब अचानक एके रात्री गायब झाले. अगदी सुभाषचंद्र बोस यांच्याप्रमाणे ते गायब झाले आणि परत कुणालाच सापडले नाहीत. नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांविरुद्ध महाराष्ट्रातल्या मराठा सत्तेपासून कानपुरच्या विद्रोहापर्यंत उठावाचा वणवा पसरला. त्यांची सोबत तेव्हा मंगल पांडेंनी दिली होती. या विद्रोहाचा परिणाम असा झाला की इंग्रजांना कानपुर सोडावं लागलं. यावेळी मोठा नरसंहार झाला याची नोंद इतिहासानं ‘सत्ती चोर घाट नरसंहार’ असं नाव दिलं.

या घटनेत नानासाहेब यांनी पहिल्यांदा इंग्रजांशी सुलाह केली. परंतू नानांच्या सैनिकांनी इंग्रजांवर अचानक छापा मारुन पळता भुई थोडी केली. यात इंग्रजी सैन्याच्या कुटुंब कबिल्यांचा बळी गेला. यात अनेक लहान मुलांचा आणि महिलांचा बळी गेला. या हल्ल्यानंतर तिथून पळ काढण्यात नानासाहेब यशस्वी झाले. कुणालाच माहित नाही नानासाहेब कुठं गेला. बिठूरहुन निघालेले नानासाहेब नेपाळात पोहचले आणि शेवटपर्यंत तिथं दडून राहिले. त्यांनी स्वतःची ओळख लपवली होती. नानासाहेबांसोबत निसटणाऱ्या व्यक्तींमध्ये एक व्यक्तीचा सामावेश होता नाव ‘महाराणी तपस्विनी.’ त्या राणी लक्ष्मीबाई यांची भाची आणि बेलुरचे जमीनदार नारायण राव यांची मुलगी होती. त्यांनी देखील १८५७ च्या उठावात नानांसोबत त्यांनी क्रांतीत हिस्सा घेतला. क्रांती अयशस्वी झाल्यानंतर इंग्रजांनी त्यांना ‘तिरुचिरापल्ली’ येथे कैदेत ठेवलं.

इंग्रजांना मिळाला होता खजान्याचा सुगावा

नानासाहेबांशी जोडला गेलेला विवादीत खजिना इतका मोठा होता की अनेक शतकं खर्च होईल इतकी संपत्ती. जेव्हा नानासाहेबांच्या बिठूर मधील महालावर हल्ला झाला तेव्हा नाना तिथून निसटले तरी इंग्रज फौजेने तो महाल सोडला नाही. महालातल्या खजिन्यावर त्यांची नजर होती. महालाची खुदाई करण्यात आली तेव्हा महालाखाली ७ विहरी सापडल्या. इंग्रजांना तिथं अनेक सोन्याच्या वीटा, ताटं आणि भांडी मिळाली. त्यावेळी त्यांची किंमत आठ लाख रुपये होती. हा खजिन्याच्या मोठ्या हिस्स्यातला एक भाग होता. बाकीचा खजिना स्वतःसोबत घेऊन नानासाहेब भुयारी मार्गानं निसटले. ते असे गायब झाले की आजपर्यंत ना त्यांच्याबद्दल काही ठोस माहिती मिळाली न त्यांच्या खजिन्याबद्दल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button