कसाबमध्ये माणूस शोधणाऱ्यांनी आता ‘मुखपट्ट्या’ लावल्या का? आशिष शेलार यांचा सवाल

Ashish Shelar

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर हिंसाचार भडकला. यात काही भाजप (BJP) कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्लेही करण्यात आले. आता या हिंसाचाराचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावरूनच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी एरवी मानवतेच्या नावाने गळे काढणारे, सहिष्णुतेचे तथाकथित पुजारी, कसाबमध्ये माणूस शोधणाऱ्यांनी आता ‘मुखपट्ट्या’ लावल्या आहेत का? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

यासंदर्भात आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट केले आहे. “पश्चिम बंगालमध्ये दीदींनी विजयाचा उन्माद घालत, भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले, हत्या, घरांची, भाजपा कार्यालयांची जाळपोळ अशी हिंसाचाराची मालिका सुरू केली. एरवी मानवतेच्या नावाने गळे काढणारे, सहिष्णुतेचे तथाकथित पुजारी, कसाबमध्येसुद्धा माणूस शोधणाऱ्यांनी आता ‘मुखपट्ट्या’ लावल्या का?” असा सवाल ट्विटच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हिंसाचार भडकला. या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे ४ मे रोजी दोन दिवसांकरिता बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. या ठिकाणी हिंसाचारग्रस्त भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या नातलगांची भेट घेणार आहेत. गेल्या २४ तासांत टीएमसीच्या गुंडांनी बंगालमध्ये नऊ कार्यकर्त्यांची हत्या केली, असा आरोप भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button