कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले का? देशमुखांवर झालेल्या कारवाईवर मलिक संतप्त

Nawab Malik

मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर आज सीबीआयने गुन्हा दाखल करत त्यांच्या घरासह १० ठिकाणी छापेमारी केली. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी संतप्त होत सीबीआयच्या कारवाईचा निषेध नोंदवला. कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते काय? असा प्रश्न नवाब मलिक यांनी सीबीआयला विचारला आहे.

आज सकाळी सीबीआयने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या घरासह १० ठिकाणी छापेमारी केली. यानंतर नवाब मलिक यांनी संवाद साधताना हा प्रश्न उपस्थित केला आहे. सत्तेचा गैरवापर करून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सत्य लवकरच बाहेर येईल आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला. सीबीआयला संशय असेल तर चौकशी किंवा धाडी टाकू शकतात; शिवाय गुन्हा दाखल करू शकते. परंतु पहिल्या दिवसापासून ज्या पद्धतीने हे प्रकरण तयार करण्यात आले आहे, यावरून हे राजकारणच सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देऊन अहवाल सादर करायला सांगितले होते. परंतु ज्या पद्धतीने आज सीबीआयने धाडसत्र सुरू केले आहे त्यावरून मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयासमोर सीबीआयने प्राथमिक अहवाल ठेवला का? कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय किंवा आदेश दिला आहे का? याबाबतची माहिती समोर आलेली नाही किंवा आमच्याकडे उपलब्ध नाही, असेही ते म्हणाले.

कायद्यासमोर कुणीही मोठा नाही. देशमुख यांनी सुरुवातीपासून सीबीआय चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. घटना ही अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या बॉम्बची आहे. त्यामध्ये आजपर्यंत सचिन वाझे (Sachin Vaze) कुणाच्या सांगण्यावरून काम करत होता याबाबतचे स्पष्टीकरण एनआयएने दिलेले नाही. याशिवाय यामध्ये माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भूमिका काय होती? त्यांच्या पत्रावरून कारवाई होतेय हे राजकारण सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : देशमुखांवरील कारवाई विचारपूर्वक रचलेले कटकारस्थान, हसन मुश्रिफांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button