आरक्षण मिळू नये ही केंद्राची इच्छा होती का? नाना पटोलेंचा संतप्त सवाल

Nana Patole

मुंबई :- मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्याने काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रावर टीका केली आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय अनाकलनीय आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खोटं बोलून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. या खटल्यात मोदी सरकारची भूमिका संदिग्ध होती. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हीच मोदी सरकारची इच्छा होती का? असा सवाल नाना पटोले (Nana Patole) यांनी उपस्थित केला आहे.

आरक्षणासंदर्भात नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्राने केलेली १०२ वी घटनादुरुस्ती ही मराठा आरक्षणाच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा ठरली आहे. गायकवाड समितीच्या अहवालाच्या आधारे राज्याने मराठा आरक्षण कायदा संमत केला होता. हा कायदा संसदेत पारित होताना, अनेक खासदारांनी चिंता व्यक्त केली होती की, या दुरुस्तीमुळे राज्यांना आरक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाईल. पण यावर केंद्रीय कायदामंत्र्यांनी राज्याचे अधिकार जाणार नाहीत, असा निर्वाळा दिला होता.

मात्र, आता केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा या निर्णयाचे दूरगामी दुष्परिणाम होणार आहेत, असे पटोले यांनी सांगितले. गायकवाड आयोग फडणवीस सरकारने नेमला. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्यासाठी वकीलही फडणवीस यांनीच नेमले. १०२ व्या घटनादुरुस्तीचा अडथळा मोदी सरकारने आणला. देवेंद्र फडणवीस स्वतःच्या आणि मोदी सरकारच्या कर्माची जबाबदारी राज्य सरकारवर कशी टाकू शकतात? असा संतप्त सवाल पटोलेंनी केला. ही केवळ मराठा समाजाची समस्या नाही, तर याचा परिणाम देशातील विविध भागांतील आरक्षणाच्या मुद्यावरून लढा देणार्‍या समाजातील छोट्या घटकांवरही होईल.

भविष्यात अशा मागण्यांसाठी केंद्राकडे जाण्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाही. आरक्षण मिळावे ही काँग्रेसची आधीपासूनची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सखोल अभ्यास करून राज्य सरकारने योग्य ती पावले उचलली पाहिजेत, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button